Onion Crop Agriculture
ॲग्रो विशेष

Onion Crop Destroyed : सावकीत कांदा रोपांवर फिरविला नांगर

Onion Cultivation : मागील वर्षी तालुक्यात दुष्काळ होता. गिरणाकाठ परिसर वगळता इतरत्र उन्हाळी कांद्याची लागवड झालेली नव्हती.

Team Agrowon

Nashik News : गेल्या वर्षी या दिवसांत उन्हाळी कांद्याचे रोप पैसे देऊनही मिळत नव्हते. पण यावर्षी कांद्याचे रोप कोणी फुकटही घेऊन जात नाही अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या महागड्या कांदा रोपांवर नांगर फिरवला आहे.

मागील वर्षी तालुक्यात दुष्काळ होता. गिरणाकाठ परिसर वगळता इतरत्र उन्हाळी कांद्याची लागवड झालेली नव्हती. त्यामुळे मागील वर्षी उन्हाळ कांद्याची मोठ्या प्रमाणावर घट दिसून आली होती. त्यामुळे भावही बऱ्यापैकी होते. यावर्षी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने लहान मोठे पाझर तलाव भरले असून, नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत.

त्यामुळे शेतकऱ्यांनी महागडे कांद्याचे बियाणे घेऊन रोपे तयार केली आहेत. कांदा लागवडीचे क्षेत्रदेखील वाढले आहे. मध्यंतरी अवकाळी पाऊस झाल्याने ही रोपे खराब झाली होती. नंतर शेतकऱ्यांनी पुन्हा बियाणे विकत घेऊन रोप टाकले होते. उशिरा रोप टाकल्यापासून अवकाळी पावसाने कृपा दाखविल्याने कांद्याची रोपे चांगली आली. त्यामुळे सध्या तालुक्यात सर्वत्र कांदा लागवडीची लगबग आहे.

मात्र, मजूर मिळत नसल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. जवळपास ८० टक्के लागवड पूर्ण झाली असून, आता बहुतांश शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा रोपे शिल्लक राहिली आहेत.

पूर्ण जानेवारी महिन्यामध्ये कांदा लागवडीची धावपळ सुरू राहील नंतर नोव्हेंबर महिन्यात महागडी बियाणे घेऊन शेतकऱ्यांनी रोपे जतन केली होती. स्प्रिंकलर, रेन पाइप किंवा गादी वाफा करून रोपे चांगली आल्याने अनेक शेतकऱ्यांकडे शिल्लक आहेत. ८० टक्के लागवड झाल्याने आता मोठ्या प्रमाणावर रोपे शिल्लक राहिल्यामुळे नुकसान झाले.

कांदा लागवडीसाठी दोन हजार ते २२०० रुपये प्रतिकिलोप्रमाणे जवळपास ६० किलो बियाणे टाकले होते. कांदालागवड पूर्ण झाली आहे. साधारण १२ किलो बियाण्याचे कांदा रोप शिल्लक आहे. ते फुकटदेखील कोणी घेण्यास तयार नसल्याने शेवटी त्यावर नांगर फिरवला.
- धनंजय बोरसे, कांदा उत्पादक, सावकी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT