Onion Scam Maharashtra Agrowan
ॲग्रो विशेष

Onion Scam Maharashtra : कोट्यावधींचा कांदा घोटाळा; राज्यातील १५ कंपन्यांवर केंद्राकडून थेट कारवाई

Nashik Onion : एनसीसीएफचे महासंचालक अनीस जोसेफ चंद्रा यांनी या बद्दल आदेश काढले आहेत. तसेच पुण्यातीलही एका एफपीओवर गुन्हा नोंदवला आहे.

sandeep Shirguppe

Nashik Onion Scam Company : नाशिक विभागातील १५ कांदा उत्पादक कंपन्यांवर केंद्र सरकारने कारवाई केली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयाकडून एनसीसीएफशी संबंधित १५ शेतकरी उत्पादक कंपन्यांना काळ्या यादीत टाकले आहे. याचबरोबर त्यांच्यासोबत होणारे सर्व व्यवहार तातडीने थांबवण्यात आले आहेत. एनसीसीएफचे महासंचालक अनीस जोसेफ चंद्रा यांनी या बद्दल आदेश काढले आहेत. तसेच पुण्यातीलही एका एफपीओवर गुन्हा नोंदवला आहे.

मागच्या काही काळापासून नाशिकमधील शेतकरी नेत्यांनी कांदा खरेदीत घोटाळा होत असल्याचे पुराव्यासह उघड केले होते. परंतु संबंधित कंपन्यांवर कारवाई होत नव्हती. मात्र, भ्रष्ट अधिकारी आणि कंपन्यांना पुराव्यासह पकडण्यात आल्याने थेट कारवाई करण्यात आली आहे.

मागील काळात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला निवडणुकांत राजकीय फटका बसला. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाची गंभीर दाखल घेऊन अखेरीस कांदा घोटाळा करणाऱ्या कंपन्यांवर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई केली असल्याचे बोलले जात आहे.

या कंपन्यांचा समावेश

१) गौतमी गोदावरी फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड, २) पान्झाराक्कन फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड, ३) जनाई डेअरी शेतकरी प्रोडूसर कंपनी लिमिटेड, ४) गोदावरी फार्म्स असोसिंएट प्रोडूसर कंपनी लिमिटेड, ५) महा एफपीओ फेडरेशन, ६) गंगा मध्यमेश्वर फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड, ७) गुरुसिद्धी फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड.

८) दि लोकराजे शाहू महाराज मल्टीस्टेट अॅग्रो को ऑप. सोसायटी लिमिटेड, ९) स्वप्नशिवार अॅग्री फार्म प्रोडूसर कंपनी लिमिटेड, १०) श्री स्वामिनी फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड, ११) कणलाड अॅर्गो फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड, १२) अग्निवेश अॅर्गो फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड, १३) सेवेन क्रिस्टल अॅग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड, १४) मल्मथ शेतकरी विकास प्रोडूसर कंपनी लिमिटेड, १५) जय अॅग्रो फार्मर्स प्रोडूसर कंपनी लिमिटेड. या कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT