Team Agrowon
पांढरा कांदा कच्चा सेवन करू शकतो, याचसोबत शिजवून देखील आहारात वापरता येतो.
पांढरा कांद्यात सल्फर आणि फ्लेवोनाइड अँटिऑक्सिडेंट असते. ज्यामुळे आपल्या शरीरातील कर्करोगाशी लढा देण्यासाठीची शक्ती वाढते.
पांढऱ्या कांद्यामध्ये क्वेरसेटिन आणि फाईसेटिन असते. यामुळे ट्यूमर वाढत नाही. कांद्यामध्ये क जीवनसत्त्व असते.
पांढऱ्या कांद्यामध्ये फ्लेवोनाईड, तंतूमय घटक, फोलिक ॲसिड, प्रीबायोटिक्स, अँटिऑक्सिडेंट तसेच जिवाणूविरोधी घटक असतात. हे घटक आपल्या पोट, आतडे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
कांद्याच्या सेवनाने पचनासंबंधी कोणतीही समस्या तसेच विकार होत नाहीत. ज्यांना मधुमेहाची समस्या आहे त्यांनी आहारात पांढरा कांद्याचे सेवन करावे.
ज्या व्यक्तींना साखरेची समस्या असेल अशा व्यक्तींनी पांढरा कांद्याचे सेवन करावे. आपल्या रक्तात असलेल्या साखरेचे प्रमाण नेहमी संतुलित रहाते.
पांढऱ्या कांद्यामध्ये क्रोमिअम आणि सल्फर असते, ते रक्तामधील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्याचे काम करत असतात.