Chh. Sambhajinagar DPDC : कौशल्य विकासातून ऑटोमोबाइल उद्योगाला बळकटी! नियोजन आराखड्यात विशेष भर

Automobile Industry : मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आसलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची ‘ऑटोहब’ म्हणून ओळख होत आहे.
District Development
District DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आसलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची ‘ऑटोहब’ म्हणून ओळख होत आहे. ऑटोमोबाइल क्षेत्रामध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य विकास, तंत्रनिकेतन, उद्योग यांनी समन्वयाने विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण राबविणे आवश्यक आहे.

यामुळे कुशल मनुष्यबळ उपलब्धता करण्याच्या उपाययोजनांचा नियोजन आराखड्यात समावेश करावा. असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे यांनी दिले.

District Development
Beed DPDC : बीडच्या विकासाला गती! ५३६ कोटींच्या योजनांना प्रशासकीय मान्यता

जिल्हा विकास आराखडा समितीची आढावा बैठक गुरुवारी (ता. ३०) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भरत वायाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे सहायक आयुक्त सुरेश वराडे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी मनीषा हराळ या बैठकीस उपस्थित होते.

District Development
Akola DPDC : अकोल्याच्या ३५९ कोटींच्या प्रारूप आराखड्याला मान्यता

श्री कांबळे म्हणाले, की उत्पादन, निर्यात, पर्यटन, स्थानिक लघुउद्योग, वितरण व्यवस्था, कृषी यासह निर्यात क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. खासगी संस्थांचे सहकार्य आवश्यक तेथे घेण्यात यावे.

लॉजिस्टिक पार्क तयार करुन साठवण क्षमता वाढवणाऱ्या गोदामांची निर्मिती करण्यात यावी. शेतीमालावर प्रक्रिया करण्यासही वाव आहे. त्यात मका, भाजीपाला, फळ प्रक्रिया यासारख्या उद्योगाची जास्तीत जास्त युनिट स्थापन करून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करण्यात येईल. पर्यटन वाढीसाठी उपलब्ध दळणवळण व्यवस्थेबाबतही पोलिस, जिल्हा प्रशासन, हवाई वाहतूक व सर्व वाहतूक यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com