Onion Market Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Rate : चार दिवसांपासून कांदा दरात काहीशी वाढ

Onion Market : अहिल्यानगरसह पारनेर, श्रीरामपूर, राहाता बाजार समितीत कांदा दरात काहीशी वाढ झाली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : पावसाने अहिल्यानगरला कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम बाजारात दिसून येऊ लागला आहे. अहिल्यानगरसह पारनेर, श्रीरामपूर, राहाता बाजार समितीत कांदा दरात काहीशी वाढ झाली आहे. सध्या प्रती क्विंटलला ३०० रुपयांपासून १८०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. काही दिवसांपूर्वी हा दर १४०० रुपयांपर्यंत होता.

अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा दरवर्षीपेक्षा जवळपास ८० हेक्टर क्षेत्रा अधिक म्हणजे केवळ रब्बी, उन्हाळीत सव्वादोन लाख हेक्टरवर कांदा लागवड झाली. एप्रिल-मे महिन्यात कांदा काढणी केली जाते. अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढणी करून टाकली. काही ठिकाणी काढणी सुरु होती. त्याच जिल्हाभर महिनाभरापासून पाऊस होत आहे.

अनेक भागात जोरदार, वादळी पाऊस झाला. सुरवातीच्या काळात गारपीट झाली. त्यामुळे कांद्याचे मोठे नुकसान झाले. चार दिवसांपूर्वी झालेल्या पाऊस, पुरामुळे अहिल्यानगर तालुक्यात बारा हजार टन कांदा वाहून गेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कांद्याच्या नुकसानीचे परिणाम सध्या बाजारात दिसून येत आहेत.

अहिल्यानगर बाजार समितीत गुरुवारी (ता. २९) ६५ हजार ७११ गोण्याची आवक झाली. त्या दिवशी ३०० ते १८०० रुपये आणि सरासरी १२०० रुपयांचा दर मिळाला. काही दिवसांपूर्वी साधारण जास्तीत जास्त १४०० रुपयांपर्यंत दर होता. पारनेर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याच्या २४८३९ कांदा गोण्यांची आवक झाली.

कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १५०० ते १७००, दोन नंबर कांदा ः १३०० ते १४००, तीन नंबर कांदा ः १००० ते १२००, चार नंबर ः २०० ते ७००, गोल्टी कांदा ः ९०० ते १३००. पाच ते दहा क्विंटलला १७२५ ते १९०० रुपये प्रतिक्विंटलचा भाव मिळाला. श्रीरामपूर येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. एक नंबर कांद्याला १८०० रुपयांचा भाव मिळाला. श्रीरामपूर तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याच्या १२९१५ गोण्यांची आवक झाली.

कांद्याच्या प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १४०० ते १८००, दोन नंबर कांदा ः १००० ते १३५०, तीन नंबर कांदा ः ६०० ते ९५०, गोल्टी कांदा ः १००० ते १४००, खाद ः १०० ते ५५०. मोकळा कांद्याचे लिलाव झाले. एकूण १३५ वाहनातून कांद्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला ११०० ते १३६५, दोन नंबर कांद्याला ः ९०० ते ११००, तीन नंबर कांद्याला ः ६०० ते ९००, गोल्टी कांद्याला ११०० ते १३००, खाद ः २५० ते ६००. राहाता येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले.

यामध्ये एक नंबर कांद्याला १८०० रुपयांचा भाव मिळाला. राहाता तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याच्या १०९४५ कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १४०० ते १८००, दोन नंबर कांदा ः ९०० ते १३५०, तीन नंबर कांदा ः ५०० ते ८५०, गोल्टी कांदा ः ८०० ते १३००, जोड कांदा ः ३०० ते ६००.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers Support: कांद्याच्या भावात घसरण, उपाययोजनांसाठी सरकारकडून समिती गठित

Crop Damage Nashik: नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी ७३ कोटींच्या निधीचा प्रस्ताव

Fertilizer Overprising: सोलापूर जिल्ह्यातील १९ कृषी केंद्रांचे परवाने निलंबित

Assembly Elections 2026: पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात विक्रमी ९१.४६ टक्के, तामिळनाडूत ८४.४१ टक्के मतदान

Crop Insurance Hingoli: हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनचा ९८ कोटी ७० लाख रुपये पिकविमा मंजूर

SCROLL FOR NEXT