Onion Market Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Market : कांदा बाजारभावावरील गंभीर स्थितीवर लासलगावी होणार चर्चा

Onion Rate Crisis : सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला अत्यल्प दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

Team Agrowon

Nashik News : कांद्याच्या बाजारभावावरील गंभीर स्थितीवर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. २८) दुपारी २ वाजता पदाधिकारी आणि शेतकरी यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे जिल्हा युवक अध्यक्ष केदारनाथ नवले यांनी दिली.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये ही बैठक होणार आहे. सध्या राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला अत्यल्प दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहेत. यासाठी अती तातडीने उपाययोजना करण्यासाठी राज्य शासनाचे लक्ष वेधणे आवश्यक आहे.

याच पार्श्‍वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे शिष्टमंडळाद्वारे निवेदन देणे, तसेच आवश्यक उपाययोजना सुचवणे या दृष्टीने ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

सध्या कांद्याला मिळणाऱ्या बाजारभाव, उत्पादन खर्च आणि तोट्याची मांडणी, शासन अनुदान,हस्तक्षेप, खरेदी, किमान आधारभूत किंमत याबाबत मागण्या, कांदा प्रश्‍नावर मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करावयाच्या निवेदनाचा मसुदा तयार करणे, ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’ची कांदा खरेदी शेतकरीपूरक करण्यास भाग पाडणे तसेच पुढील आंदोलनाची दिशा ठरविणे आदी महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.

या वेळी संघटनेचे राज्य, विभागीय, जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Fruit Drop: डाळिंबातील फुलगळीची कारणे काय?

Farmers Issues: दोन लाखांच्या मर्यादेमुळे फळबागधारक कर्जमाफीपासून वंचित

PM POSHAN Shakti: कागदावर पौष्टिक मेनू; प्रत्यक्षात साधी खिचडी !

Agriculture Expo: के. के. वाघ कृषी महोत्सवात फलोत्पादनाचे ‘लाईव्ह प्लॉट्स’

Chia Cultivation: पूर्व विदर्भात ‘चिया’ लागवडीला चालना

SCROLL FOR NEXT