Onion Export Ban agrowon
ॲग्रो विशेष

Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी उठविलेली नाही

Onion Export : सरकारचे स्पष्टीकरण; ३१ मार्चपर्यंत बंदी कायम

Team Agrowon

Onion Market : नवी दिल्ली (पीटीआय) ः पूर्वीच्या घोषणेप्रमाणे कांदा निर्यातीवरील बंदी ३१ मार्चपर्यंत कायम राहील. ही बंदी उठविलेली नसून ती लागू आहे, असे स्पष्टीकरण केंद्रातील एका उच्च अधिकाऱ्याने मंगळवारी (ता. २०) दिले.

८ डिसेंबर २०२३ रोजी सरकारने ३१ मार्च २०२४ पर्यंत कांदानिर्यातीवर बंदी घातली होती. ‘‘कांदा निर्यातीवरील बंदी उठवण्यात आलेली नाही. ती लागू आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही,’’ असे ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांनी ‘पीटीआय’ला सांगितले आहे. ‘‘ग्राहकांना वाजवी दरात पुरेसा कांदा उपलब्ध व्हावा, हा या मागील मुख्य हेतू आहे,’’ असेही ते म्हणाले.

रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन २२.७ दशलक्ष टन होण्याचा अंदाज होता. त्या अनुशंगाने कृषी मंत्रालयाचे अधिकारी येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि गुजरात या प्रमुख कांदा उत्पादक राज्यांमध्ये रब्बी कांद्याच्या उत्पादन स्थितीचा आढावा घेणार असल्याचे समजते. दरम्यान, मंत्रालय गटाच्या मंजुरीनंतर मित्र देशांत कांदा निर्यात करण्यास ‘केस-टू-केस’ या आधारावर परवानगी दिली जाते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

निर्यातबंदी उठविल्याच्या वृत्तानंतर दरात वाढ
निर्यातबंदी उठविल्याच्या वृत्तानंतर देशातील सर्वांत मोठी घाऊक कांदा बाजारपेठ असलेल्या लासलगाव येथे सोमवारी (ता. १९) घाऊक कांद्याचे दर ४०.६२ टक्क्यांनी वाढून १८०० रुपये प्रतिक्विंटल झाले. शनिवारी (ता. १७) हे दर १२८० रुपये प्रतिक्विंटल होते.

३१ मार्चनंतरही बंदी उठण्याची शक्यता कमीच
दरम्यान, रब्बीत महाराष्ट्रातील कांदा पिकाखालील क्षेत्र घटल्यामुळे कांद्याचे उत्पादन कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ३१ मार्चनंतरही ही बंदी उठवली जाण्याची शक्यता कमीच आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT