Onion Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : सततच्या पावसामुळे कांदा लागवड रखडली

Onion Farming : खानदेशात कांदा लागवड रखडली आहे. सतत पाऊस सुरू असून, काळ्या कसदार जमिनीत वाफसा स्थिती नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात कांदा लागवड रखडली आहे. सतत पाऊस सुरू असून, काळ्या कसदार जमिनीत वाफसा स्थिती नाही. अतिपाऊस झाल्यास रोपांच्या उगवणीस फटका बसेल, यामुळे अनेक जण लागवड टाळत आहेत.

खानदेशात खरिपातील कांदा लागवडीत घट येईल, असे संकेत आहेत. सततच्या पावसाने अनेकांनी लेट खरीप कांदा लागवडीचे नियोजन अलीकडेच केले आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी उत्तम व्यवस्थापन करून कांदा रोपवाटिका वाढविल्या. रोपे पुनर्लागवड योग्य झाली आहे. परंतु पावसाने लागवड रखडली आहे.

खानदेशात खरिपातील कांद्याची लागवड सात हजार हेक्टरवर होईल, अशी अपेक्षा आहे. सर्वाधिक पाच हजार हेक्टर एवढी लागवड धुळ्यात अपेक्षित आहे. धुळ्यातील साक्री तालुक्यातील लागवड चार हजार हेक्टरपेक्षा अधिक होईल, अशीही माहिती आहे.

खरिपातील कांदा लागवड या महिन्यात गती घेईल, अशी अपेक्षा होती. परंतु पावसामुळे लागवड रखडत सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी लागवड उरकली आहे. ही लागवड अनेकांनी गादीवाफ्यावर केली आहे. अतिपावसात गादीवाफ्यांमुळे नुकसान टळेल, पिकात तूट येणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पावसाने रोपवाटिकांचीदेखील हानी मागील महिन्यात झाली आहे. यामुळे रोपांची टंचाई काही भागात आहे. रोपांचा तुटवडाही काही भागात तयार होईल, अशी स्थिती आहे. अनेकांनी रोपवाटिका तयार केल्या होत्या. त्यातील रोपांची पुनर्लागवडीचे नियोजन होते. परंतु पावसाने रोपवाटिकांचे नुकसान झाल्याने लागवड कमी करावी लागेल, अशी स्थिती अनेकांसमोर आहे.

यातच आता अनेक शेतकरी लेट खरिपातील कांदा लागवडीचे नियोजन करीत आहेत. लेट खरीप कांदा पिकाची सप्टेंबरमध्ये लागवड सुरू होईल. त्यादृष्टीने सध्या काही शेतकरी रोपवाटिका तयार करीत असल्याची माहिती आहे. लेट खरीप कांदा लागवडदेखील खानदेशात अडीच ते तीन हजार हेक्टरवर होईल, असे संकेत आहेत. या लागवडीसाठी शेतकरी पूर्वमशागतची तयारी करीत आहेत. पण त्यातही पावसाचा व्यत्यय येत आहे. यामुळे खानदेशातील कांदा लागवड रखडत असल्याची स्थिती आहे.

मध्यम जमिनीत लागवड

साक्री व अन्य भागात मध्यम, हलक्या जमिनीत काही शेतकरी कांदा लागवड करीत आहेत. काळ्या कसदार जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही. अनेकदा सखल भागात पाणी साचते. यामुळे शेतकरी काळ्या कसदार जमिनीत लागवड टाळत आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल भागात काळ्या कसदार जमिनीत कांदा लागवड रखडल्याची स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी?

Pandharpur Wari: पंढरपूरच्या वाटेवर संतांचे पालखी सोहळे

Maharashtra Transport Strike: मालवाहतूकदारांच्या आंदोलनाला प्रतिसाद

Tur Dal Cess Scam: तूर सेस चोरीच्या दंडाचे २६ लाख न्यायालयात आगाऊ भरावेत

Global Onion Market: भारतीय कांद्यापेक्षा पाकिस्तान, चीनच्या कांद्याला मागणी

SCROLL FOR NEXT