Onion Cultivation  Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Cultivation : अहिल्यानगर जिल्ह्यात कांदा क्षेत्र वाढले

Onion Plantation : अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत खरीप, लेट खरीप आणि रब्बीत मिळून सुमारे २ लाख ५६ हजार १८५ हेक्टरवर लागवड झाली आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत खरीप, लेट खरीप आणि रब्बीत मिळून सुमारे २ लाख ५६ हजार १८५ हेक्टरवर लागवड झाली आहे. केवळ रब्बीत आतापर्यंत १ लाख ४१ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा लागवड झाली आहे. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा लगवड क्षेत्र वाढणार असल्याचा अंदाज आहे.

जिल्ह्यात अलीकडच्या दहा वर्षांपासून कांद्याच्या क्षेत्रात वाढ होत आहे. गेल्या दोन वर्षांपासून कांद्याला पुरेसा दर नसल्याने कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला. मात्र तरीही शेतकरी कांदा लागवडीलाच प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात साधारण दोन लाख हेक्टरपर्यंत जिल्ह्यात कांदा लागवड होत असते.

यंदा खरीप, लेट खरीप, रब्बी मिळून आतापर्यंत २ लाख ५६ हजार १८५ हेक्टरवर लागवड झाली आहे. अहिल्यानगर, पारनेर, कर्जत, श्रीगोंदा तालुक्यांत आतापर्यंत सर्वाधिक लागवड झाली आहे. श्रीरामपूर, राहाता, नेवासा, शेवगाव, अकोले तालुक्यांत मात्र यंदा कांदा क्षेत्र अल्प आहे. खरिपात कांद्याचे सरासरी २० हजार २६८ हेक्‍टर क्षेत्र आहे.

यंदा ३६ हजार ३८१ हेक्टरवर लागवड झाली होती. लेट खरिपात ५५ हजार ३४८ हेक्टर सरासरी क्षेत्र असून ७८ हजार ८१४ हेक्टरवर लागवड झाली आहे. लेट खरीप व रब्बीची लागवड अधिक असते. उन्हाळी कांदाही रब्बीत गणला जातो.

यंदा पाण्याची स्थिती चांगली आहे. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी महिन्यांत कांदा लागवड अधिक प्रमाणात होणार असल्याचा अंदाज होता. त्यानुसार कांदा लागवडीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सध्या लागवडी सुरू आहेत.

आतापर्यंत २ लाख ५६ हजारांपेक्षा अधिक लागवड झाली असून हा आकडा तीन लाखांपर्यंत जाऊ शकतो असा अंदाज आहे. यंदा कांदा बियाणाला मागणी अधिक होती. शेतकऱ्यांची मागणी वाढत असताना विक्रेत्यांनी तुटवडा निर्माण केला गेला.

त्यामुळे उपलब्ध बियाण्यांची चढ्या दराने विक्री झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान, सध्या बाजारात कांद्याला चार-पाच महिन्यांपासून दर चांगला आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहे.

यंदाचे आतापर्यंतचे लागवड क्षेत्र

अहिल्यानगर २७,६४६

पारनेर ४९,०५२

पाथर्डी १८,४८२

कर्जत २७,८४९

जामखेड १५,६४९

श्रीगोंदा ४१,३१८

श्रीरामपूर ४,३४६

राहुरी ३,९५५

नेवासा २५,३६२

शेवगाव १२,१७९

संगमनेर २,०१३

कोपरगाव १३,६२०

अकोले ९,०६०

राहाता ४,७५२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

Vice President Election 2025 : सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५ वे नवे उपराष्ट्रपती, इंडिया आघाडीची मते फुटली

Hivare Bazar Village: हिवरे बाजारला ‘जल समृद्ध गाव’ पुरस्कार

Cotton Cultivation: पुणे जिल्ह्यात कापूस लागवडीत होतेय वाढ

Organic Fertilizer Production: कणकवलीत सहा टन निर्माल्यापासून खत निर्मिती

SCROLL FOR NEXT