Tree Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Tree Plantation : दहा लाख झाडे लावणार

Green Akola Initiative : यंदा जिल्हा प्रशासन पावसाळ्यात ‘ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह’ या उपक्रमातून १० लाख झाडे लावणार आहे. तर या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विविध विभागांसह स्वयंसेवी संस्था, विविध क्षेत्रांतील संघटना, तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Team Agrowon

Akola News : तीव्र उष्णतामानामुळे जिल्हा यंदा होरपळून निघत आहे. वाढलेल्या उष्णतामानाचा त्रास सर्वांना सहन करावा लागत असून, प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. यंदा जिल्हा प्रशासन पावसाळ्यात ‘ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह’ या उपक्रमातून १० लाख झाडे लावणार आहे. तर या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी विविध विभागांसह स्वयंसेवी संस्था, विविध क्षेत्रांतील संघटना, तसेच नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

मागील काही दिवसांपासून अकोला जिल्ह्यामध्ये सरासरी ४४ ते ४५ सेल्सिअस तापमान नोंदवले जात आहे. दिवसेंदिवस उष्णतेचा पारा वाढतो आहे. गेल्या वर्षी नोंदविलेल्या सरासरी तापमानापेक्षा या वेळीचे तापमान जास्त असल्याचे दिसून आले आहे. एकंदर पर्यावरणीय बदलामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून भविष्यात तो आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करणे हा वाढते तापमान कमी करण्याचा उपाय आहे. जगातील पर्यावरण तज्ज्ञांच्या सूचनेनुसार मोठ्या प्रमाणावर घनवन अर्थात ‘मियावाकी’ पद्धतीने वृक्षारोपण केल्यास निश्‍चितच तापमानवाढीस काही प्रमाणात आळा बसू शकेल. त्यानुसार संपूर्ण जिल्हाभरात जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ‘ग्रीन अकोला इनिशिएटिव्ह’ राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बुधवारी (ता. पाच) या उपक्रमाची सुरुवात होईल.

‘मियावाकी’ व ‘स्वस्तिक’ पद्धतीने वृक्षारोपण पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात किमान १० लाख वृक्ष लागवड घनवन (मियावाकी) अथवा स्वस्तिक लागवड पद्धतीद्वारे करण्याचे नियोजन आहे. जिल्ह्यातील सर्व विभागांच्या मोकळ्या जागांवर, कार्यालयांच्या परिसरात, ग्रामपंचायत तसेच महापालिका नगरपालिका क्षेत्रात, शासकीय जमिनीवर विस्तृतपणे अशा प्रकारे वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. रोपांची उपलब्धता वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाने करावी.

वृक्ष लागवडीसाठी जमीन तयार करणे, आवश्यक असल्यास कुंपण, पाण्याची व्यवस्था यासाठी पंधरावा वित्त आयोग, सीएसआर निधी, कर्मचारी, लोकसहभाग याद्वारे निधी उपलब्धतेची कार्यवाही करावी, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी विविध विभागांना दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT