Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : नांदेड विभागात एक कोटी टन उसाचे गाळप

सध्या १७ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने ते बंद झाल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल यांनी दिली.

कृष्णा जोमेगावकर

Nanded News : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील ३० साखर कारखान्यांनी आजपर्यंत एक कोटी लाख २१ हजार ५०४ टन उसाचे गाळप (Sugarcane Crushing) तर एक कोटी पाच लाख ६४ हजार ३६१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.

सध्या १७ साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ऊस संपल्याने ते बंद झाल्याची माहिती साखर सहसंचालक सचिन रावल यांनी दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतून गाळप हंगाम २०२२-२३ साठी ३१ कारखान्यांनी ऑनलाइन अर्ज केले होते. यात २० खासगी तर ११ सहकारी साखर कारखान्यांचा समावेश होता.

यंदा हंगामाची सुरुवात २२ आक्टोबर रोजी लातूर जिल्ह्यातील सिद्धी शुगर ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज या खासगी साखर कारखान्याच्या गाळपाने झाली.

गाळप हंगामात विभागात ३० कारखाने सुरु झाले होते. यात परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी तसेच लातूर जिल्ह्यातील सहा सहकारी व सहा खासगी अशा कारखान्यांचा समावेश आहे.

सध्या विभागाचा गाळप हंगाम आटोपतीकडे चालला आहे. नांदेड विभागातील १७ कारखान्यांचा पट्टा पडला आहे. यात नांदेड जिल्ह्यातील सहा, लातूरमधील चार, हिंगोलीतील चार तर परभणीतील तीन कारखान्यांचा समावेश आहे.

आजपर्यंत ३० साखर कारखान्यांनी एक कोटी लाख २१ हजार ५०४ टन उसाचे गाळप तर एक कोटी पाच लाख ६४ हजार ३६१ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. गंगाखेड शुगर आघाडीवर परभणीतील गंगाखेड शुगर ॲण्ड एनर्जी लि. हा खासगी कारखाना ११ नोव्हेंबर रोजी सुरु झाला.

या कारखान्याने गाळपात विभागामध्ये घेतलेली आघाडी शेवटपर्यंत कायम ठेवली. या कारखान्याने सात लाख १४ हजार उसाचे गाळप तर सात लाख १९ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. त्या पाठोपाठ बळीराजा शुगर पूर्णा या कारखान्याने पाच लाख ७० हजार टन तर व्टेंटीवन शुगर सोनपेठने पाच लाख ६८ हजार टन उसाचे गाळप केले.

कारखानानिहाय ऊस गाळप, साखर उत्पादन

जिल्हा - कारखाने - गाळप (टनांत) - साखर उत्पादन (क्विंटल)

नांदेड - ६ - १७,७४,४४१ - १७,७७,६२०

लातूर - १२- ४२,३१,९७४ - ४२,५२,२४६

परभणी - ७- २८,५९,५९१- २८,३८,०४०

हिंगोली - ५ - १५,५५,४९८- १६,३६,४५५

एकूण - ३० - ०१,०४,२१,५०४ - ०१,०५,६४,३६१

विभागाचा सरासरी साखर उतारा : १०.०८ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahua Processing Business : गोडवा मोहफुलांच्या लाडवांचा

Beekeeping Business : तरुण उद्योजक मित्रांची अमृत मध निर्मिती

Land Circular: भोगवटादार वर्ग-२ जमिनींसाठी परिपत्रक

Soil and Water Engineering: मृदा, जलसंवर्धनामध्ये अभियांत्रिकी तंत्राचा वापर

Farmer Injustice: शेतकरी नावडे सर्वांना

SCROLL FOR NEXT