Jaljeevan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jaljeevan Mission : एक क्लिकवर कळणार जलजीवनच्या कामाची सद्यःस्थिती

जलजीवन मिशन अंतर्गत असलेल्या योजनेची कामे मार्च २०२४ पर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट्ये निश्चित करून दिली आहे.

Team Agrowon

Nashik News : जलजीवन मिशन (Jaljeevan Mission) अंतर्गत असलेल्या योजनेची कामे मार्च २०२४ पर्यंत साध्य करण्याचे उद्दिष्ट्ये निश्चित करून दिली आहे. त्यामुळे कामे वेळात व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने (Water Supply Department) हालचाली सुरू करत जलजीवन मिशन वर्क क्वालिटी मॉनिटरिंग प्रणाली विकसित केली आहे.

या ॲप्लिकेशन बेस प्रणालीचे लोकार्पण जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले. यात एका क्लिकवर योजनेतंर्गत सुरू असलेल्या कामांची सद्यःस्थिती कळणार आहे.

जलजीवन मिशन अंतर्गत १,२२२ कामे सुरू असून घाई-घाईत चुकीचे काम होऊ नये, तसेच कामात कोणी ठेकेदाराने दिरंगाई किंवा वेळकाढूपणा करून दुय्यम दर्जाचे काम होण्याचा धोका असतो.

यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या सूचनेनुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फे हे ॲप्लिकेशन तयार केले आहे. या ॲप्लिकेशनसाठी कार्यकारी अभियंता आणि शाखा अभियंता, उपअभियंता यांना तपासणीसाठी लॉगिन देण्यात आले आहेत.

कनिष्ठ अभियंता आणि योजनेसाठी नेमण्यात आलेल्या ठेकेदार यांना या प्रणालीमध्ये संबंधित पाणीपुरवठा योजनेचे व्हिडिओ, फोटो तारखेनुसार अपलोड करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

यामुळे पाणीपुरवठा योजनेचे काम किती पूर्ण झाले आहे, कामांची सद्यःस्थिती काय आहे, अपूर्ण कामे हे लक्षात येते. तसेच या कामाच्या कनिष्ठ अभियंता किती वेळा भेट दिली आहे याचे देखिल मूल्यमापन करण्यात येणार आहे.

या योजनेसाठी वितरण प्रणाली वेगवेगळी स्वरूपाची आहे. योजनेच्या कामांच्या यादीनुसार त्यांचे वर्गीकरण होणार आहे. या ॲप्लिकेशनवर करण्यात आलेल्या डाटाचा वापर जलजीवनच्या नियमित होणाऱ्या आढावा बैठकीत होणार आहे.

त्यानुसार अभियंत्यांना प्रशासनाकडून सूचना देता येणे शक्य होणार आहे. सर्व योजनांवर लक्ष केंद्रित करणे या ॲप्लिकेशनमुळे शक्य होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Farming : ऊस शेतीसाठी एकात्मिक प्रयत्न हवेत : कुलगुरू डॉ. पाटील

Rare Plant : तिलारीच्या जंगलात आढळली कचूर वनस्पती

VAMNICOM : वैकुंठभाई मेहता सहकारी संस्थेला ‘त्रिभुवन’ विद्यापीठाची मान्यता

Krishi Mandal Office : नसरापुरातील कृषी मंडल कार्यालय बेपत्ता

NCPSP Mandal Yatra : ‘राष्ट्रवादी’ची आता मंडल यात्रा

SCROLL FOR NEXT