Pandharpur News : राज्य सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची घोषणा केली. या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांना थेट खात्यावर दरमहा १५०० रुपये दिले जाणार आहेत. तसेच अधिवेशनात यावरून जोरदार हल्लाबोल विरोधकांनी सरकारवर केला होता. त्यानंतर आता युवा अप्रेंटिसशीप योजनेलाच 'लाडका भाऊ' असे गोंडस नाव देऊन आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपुरमध्ये घोषणा केली आहे.
युवा अप्रेंटिसशीप योजनेंतर्गत राज्यातील तीन वेगवेगळ्या शिक्षण गटांतील विद्यार्थ्यांचा विचार करण्यात आला आहे. अद्याप या योजनेचा कोणताही शासन निर्णय काढण्यात आला नसून मुख्यमंत्री शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेच्या धर्तीवर याची घोषणा केली आहे.
या योजनेंतर्गत बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांस दरमहा ६ हजार रुपये, डिप्लोमा उत्तीर्ण विद्यार्थ्यांला ८ हजार रुपये आणि पदवीधरास १२ हजार रुपये महिन्याला दिले जाणार आहेत. तर या योजनेंतर्गत तरूणाला एखाद्या कारखान्यात अप्रेन्टिसशिप वर्षभर करण्याची संधी मिळाली असून तेथेच अनुभवानंतर नोकरी दिली जाईल असेल शिंदे यांनी म्हटले आहे.
यावेळी मुख्यमंत्री शिंदेंनी, इतिहासात पहिल्यांदाच आपण भावांसाठी देखील योजना सुरू केल्याचे म्हणाले. तर राज्यातील मुलींसाठी १०० टक्के मोफत उच्च शिक्षणाची सुविधा देण्यात आली असून शेतकऱ्यांसाठीही विविध योजना सरकार राबवत असल्याचेही मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितले.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना काय?
यादरम्यान मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसाठी राज्यातील महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या योजनेला आता दोन महिन्याची मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे महिलांना आता ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करता येणार आहे. तर ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज केलेल्या महिलांना रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून दोन महिन्यांचे पैसे मिळतील अशी घोषणा दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याप्रमाणे रक्षाबंधनाच्या दिवशीच राज्यभरातील लाखो महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी ३ हजार रुपये जमा होतील.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.