MAFSU Skill Development Training Agrowon
ॲग्रो विशेष

Skill Development Training : ‘माफसू’च्या पुढाकाराने दिले पशुसखींना कौशल्यवृद्धी प्रशिक्षण

MAFSU : जागतिक बँक यांच्या आर्थिक साहाय्याने स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थानिक स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्थेत पशुसखींचे कौशल्यवृद्धी प्रशिक्षण घेण्यात आले.

Team Agrowon

Akola News : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (माफसू) नागपूर व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने आणि जागतिक बँक यांच्या आर्थिक साहाय्याने स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत स्थानिक स्नातकोत्तर पशुवैद्यकीय व पशुविज्ञान संस्थेत पशुसखींचे कौशल्यवृद्धी प्रशिक्षण घेण्यात आले.

अकोला इंटिग्रेटेड एक्सपोर्ट कंपनी, कारखेडा अॅग्रोप्रोड्यूसर कंपनी तसेच वुमेन लाइव्हस्टॉक फार्मर्स कंपन्यांच्या संचालिका व सदस्यांना ८ ते २२ जानेवारी दरम्यान ‘शेळी व परसातील कुक्कुटपालन’ या विषयावर १५ दिवसीय निवासी प्रशिक्षण देण्यात आले.

सोमवारी (ता.२२) या प्रशिक्षणाचा समारोप संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. एच. पावशे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. याप्रसंगी माफसूचे शिक्षण विस्तार संचालक प्रा. डॉ अनिल भिकाने, स्मार्ट प्रकल्पाच्या किरणताई महल्ले, डॉ. शामसुंदर माने आणि डॉ. जगदीश बुकतारे उपस्थित होते.

प्रकल्पाचे विद्यापीठस्तरीय समन्वयक डॉ. सारीपूत लांडगे व सहसमन्वयक डॉ. गीतांजली ढुमे, डॉ. कल्पना करगावकर तसेच डॉ. निलेश खलाटे, हे ऑनलाइन सहभागी होते.

अभिप्राय व्यक्त करताना प्रातिनिधिक स्वरूपात अर्चना पठारे, अंकिता सावजी, पुष्पा चव्हाण, अश्विनी हेटे, विजया नागपुरे आदी पशुसखींनी प्रशिक्षणाबाबत समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन प्रशिक्षण सहसमन्वयक डॉ. आर. व्ही. राऊळकर यांनी केले, तर आभार डॉ. श्याम देशमुख यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soyabean Oil Price: सोयातेलाच्या भावात ३० टक्क्यांनी वाढ

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरी शक्य

Agrowon Podcast: गहू-करडईची आवक घटली, आल्याचे दर स्थिर; पपई-फ्लॉवर दर टिकून व तेजीत

Leopard Terror : खानदेशात पर्वतीय भागात बिबट्यांची दहशत

Banana Research Center : सोलापूर जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र सुरू करावे

SCROLL FOR NEXT