LPG Gas Cylinder Agrowon
ॲग्रो विशेष

LPG Gas Cylinder : व्यावसायिक सिलेंडरच्या दरात कपात

Aslam Abdul Shanedivan

Pune News : १ एप्रिल नव्या आर्थिक वर्षातील पहिला दिवस. या दिवशी कोणती गोष्ट महाग होते आणि कोणत्या वस्तूचे दर कमी होतात. याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागलेले असते. यादरम्यान छोटे मोठ्या हॉटेल व्यावसायिकांना सोमवारी (ता. ०१) महागाईतून दिलासा मिळाला आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमती सरकारने कमी केली आहे. यामुळे १९ किलो एलपीजी सिलेंडरच्या किंमती ३०.५० ते ३२ रुपयांपर्यंत वेगवेगळ्या राज्यात कमी झाल्या आहेत. तर दर महिन्याच्या सुरुवातीला तेल कंपन्या आढावा घेतात. यानंतर गॅस सिलिंडरच्या किंमतीवर विचार केल्या जातो. याप्रमाणे सोमवारी झालेल्या आढावा बैठकीनंतर नवे दर घोषित करण्यात आले. 

देशात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या दरम्यान एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत बदल करण्यात आला आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ एप्रिलमला तेल विपणन कंपन्यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. मात्र ही कपात फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडर करण्यात आली असून घरगूती गॅस सिलिंडरच्या दरात कोणतेच बदल करण्यात आलेले नाहीत. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनच्या (IOCL) वेबसाइटनुसार, हे बदललेले दर आजपासूनच लागू करण्यात आले आहेत. 

यापूर्वी १९ किलोचा एलपीजी सिलिंडर राजधानी दिल्लीत-१७९५ रु, कोलकात्ता-१९११ रु, मुंबई - १७४९ रु आणि चेन्नईमध्ये १९६०.५० रुपयांना मिळत होता. मात्र आता ३०.५० ते ३२ रूपयांपर्यंत दरात कपात करण्यात आल्याने दिल्लीत १७६४.५० रु, , कोलकात्त्यात सर्वाधिक कपात करण्यात आली असून येथे ३२ रूपयांची कपात झाली आहे. यामुळे कोलकात्त्यात एलपीजी सिलिंडरचा नवीन दर १८७९ रूपये असेल. मुंबईत १९ किलोच्या एलपीजी सिलिंडरवर ३१.५० रूपयांची कपात करण्यात आली आहे. यामुळे मुंबईत नवीन दर १७१७.५० रूपये असेल. तर चेन्नईत ३०.५० रुपये दरात घट झाली असून नवा दर १९३० रूपये असेल. 

तीन महिन्यानंतर गॅसचा भडका कमी

गेल्या तीन महिन्यात तीन वेळा एलपीजी व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात भडका उडाला होता. यामुळे व्यावसायिक त्रस्त झाले होते. तर वाढत्या दरामुळे ते हैराण झाले होते. जानेवारी महिन्यात १.५० रुपये, फेब्रुवारी महिन्यात पुन्हा यात १४ रूपये आणि मार्च महिन्यात व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात २५.५० रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र आता लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ३२ रूपयांची कपात करण्यात आल्याने व्यावसायिकांना खुश करण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

घरगुती गॅस सिलेंडरच्या दर बदल नाही?

व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरात तब्बल ३२ रूपयांची कपात करण्यात आल्याने लहान-मोठ्या व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यामुळे घरगुती १४.२ किलोचा एलपीजी सिलेंडर आहे त्याच दरात मिळाणार आहे. सध्या घरगुती एलपीजी सिलेंडर दिल्लीत ८०३ रू, मुंबई- ८०२.५०, चेन्नई- ८१८.५० आणि कोलकात्यात ८२९ रुपयांना मिळतो. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT