sandeep Shirguppe
महिला दिनानिमित्त एलपीजी सिलिंडरच्या दरात आम्ही १०० रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोट्यवधी कुटुंबांचा आर्थिक भार, संपूर्ण कुटुंबाला आधार देण्याचे काम आमच्याकडून होत असल्याचे ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
घरगुती सिलेंडरच्या दरात कपात केल्याने महागाईने पिचलेल्या जनेतला काही प्रमाणात दिलासा मिळेल.
२०२४ मध्ये निवडणुका असल्यामुळे सिलिंडरच्या दरात मोठी कपात होण्याची शक्यता होती.
दिल्लीमध्ये सबसिडी न घेतलेल्या १४ किलो घरगुती सिलिंडरची किंमत ९०३ रुपये, कोलकातामध्ये ९२९ रुपये आहे.
केंद्र सरकारने घोषीत केल्यानंतर दिल्लीत ८०३ रुपये तर कोलकातामध्ये ८२९ रुपयांना घरगुती सिलिंडर मिळणार आहे.
मुंबईत ९०२. ५० रुपयांऐवजी ८०२.५० रुपयांना तर चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांऐवजी ८१८.५० रुपयांना मिळेल.
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना २०२४-२५ या वर्षातसुद्धा गॅस सिलिंडर हा ३०० रुपयांनी अनुदान सुरु ठेवण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे.