Solapur APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Solapur APMC Security: सोलापूरच्या सिद्धेश्वर बाजार समितीत अधिकारी-कर्मचाऱ्यांना ‘वॅाकीटॅाकी’

Siddheshwar APMC: सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीने सुरक्षा आणि प्रशासकीय कामकाज अधिक प्रभावी करण्यासाठी वॉकी-टॉकी सेवा सुरू केली आहे. ही यंत्रणा वाहनांची गर्दी, अपघात व चोरीसारख्या घटना रोखण्यात उपयुक्त ठरणार आहे.

सुदर्शन सुतार

Solapur News: सोलापूरच्या श्री सिद्धेश्‍वर बाजार समितीने बाजार समितीच्या कामकाजात सुलभता येण्यासाठी मोठा निर्णय घेतला असून, प्रशासन, विभागप्रमुख व सुरक्षा यंत्रणेच्या सदैव संपर्कात राहण्यासाठी वॉकी-टॉकी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

गेटवर होणारी वाहनाची गर्दी, अपघात, चोरीचे प्रकार टाळण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार असल्याचे बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने यांनी सांगितले.

श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती माने यांनी पुन्हा एकदा पहाटे स्वतः जाऊन कामकाजाची पाहणी केली. याच वेळी प्रशासन, विभाग प्रमुख, सुरक्षा रक्षक व सुरक्षा यंत्रणेशी त्वरित संपर्कासाठी वॉकी-टॉकी यंत्रणा कार्यान्वित केली.

त्यामुळे बाजार समितीच्या कानाकोपऱ्यात यंत्रणेशी संवाद साधला जाणार असून, गेटवर ट्रॅफिक, मालाची चोरी, यावर नियंत्रण ठेवता येणार असून गर्दी, गडबड, गोंधळ टाळण्यास मदत होणार आहे.

बाजार समितीने प्रशासकीय कामकाजात केलेल्या आमुलाग्र बदलाचे शेतकरी, व्यापारी वर्गातून कौतुक होत आहे. या वेळी बाजार समितीचे माजी संचालक केदार उंबरजे, सचिव अतुल रजपूत, सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Accident Scheme: तीस दिवसांच्या अटीऐवजी १२० दिवसांच्या मुदतीचा प्रस्ताव

Godavari Flood Management : गोदावरी पूरप्रश्नी कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर

Green Monsoon Drive : ‘ग्रीन मॉन्सून’ अंतर्गत दऱ्याई माता परिसरात ५ हजार देशी वृक्षांचे रोपण

Jalyukt Shivar Abhiyan: जलयुक्त शिवार योजनेची ६२२ कामे अंतिम टप्प्यात

District Central Bank : जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने दिली ४५८१ सभासदांची यादी

SCROLL FOR NEXT