Zilla Parishad Washim  Agrowon
ॲग्रो विशेष

Officer Suspended : सिंचन विहीर मंजुरीसाठी पैसे मागणारा अधिकारी सेवामुक्त

Zilla Parishad Washim : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी रणजित गजानन मोरे या तांत्रिक अधिकाऱ्याला कंत्राटी सेवेतून कार्यमुक्त केले आहे.

Team Agrowon

Washim News : महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत कारंजा तालुक्यातील तांत्रिक अधिकाऱ्याविरुद्ध विहीर मंजुरीसाठी २० हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार दाखल झाली होती. याची चौकशी केल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी रणजित गजानन मोरे या तांत्रिक अधिकाऱ्याला कंत्राटी सेवेतून कार्यमुक्त केले आहे.

जिल्ह्यातील शेलूवाडा (ता. कारंजा) येथील शेतकऱ्यांनी मोरे यांच्याबाबत कारंजा गट विकास अधिकारी यांच्याकडे याबाबत तक्रार दिली होती. या तक्रारीवरून गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवाड यांनी चौकशी करून सदर कर्मचाऱ्यास कार्यमुक्त करण्याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवला होता.

शेलूवाडा येथील शेतकरी शेख कलीम शेख हबीब आणि सैय्यद सादीक युसूफ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तांत्रिक अधिकारी कंत्राटी कर्मचारी रणजित मोरे यांनी विहीर मंजुरीसाठी २० हजार रुपयांची मागणी केली होती.

ज्यांनी पैसे दिले त्यांच्या विहिरींना मंजुरी दिली होती आणि ज्यांनी पैसे नाही दिले त्यांच्या प्रस्तावांमध्ये त्रुटी असल्याचे सांगून प्रस्ताव फेटाळण्यात येत असल्याची तक्रार करण्यात आली होती. मोरे यांच्याबाबत यापूर्वी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या बाबीची गंभीर दखल घेत वैभव वाघमारे यांनी मोरे यांना कंत्राटी सेवेमधून कार्यमुक्त केले आहे.

जिल्हा परिषद प्रशासनांतर्गत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांनी यातून बोध घ्यावा व कोणत्याही प्रकारचे गैरकृत्य आपल्या हातून घडणार नाही, याची काळजी घ्यावी.
वैभव वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought Situation: दुष्काळदाहातील बेपर्वाई

Sangli APMC: सांगली बाजार समिती त्रिभाजनासाठी मुदतवाढ

Agriculture Minister Field Visit: कृषिमंत्र्यांकडून पीक नुकसानीची पाहणी

Grape Farmer Support: पोलिसांच्या दणक्याने द्राक्ष शेतकऱ्यांचे ६५ लाख परत

Parbhani Rainfall Deficit: परभणीत ९५ टक्के खरिपाला फटका

SCROLL FOR NEXT