October Heat Kolhapur Agrowon
ॲग्रो विशेष

October Heat Kolhapur : ‘ऑक्टोबर हीट’ने नागरिक हैराण; कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांत पाऊस

Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात बुधवार (ता.०३) पहाटे दाट धुके होते. यानंतर सकाळी कडक ऊन आणि ढगाळ वातावरण तयार झाल्याने हवेत दमटपणा आला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur October Heat : ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात ‘ऑक्टोबर हीट’च्या चटक्याने कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा जाणवू लागला आहे. तापमान वाढ आणि ढगाळ वातावरणामुळे अंगातून घामाच्या धारा वाहत आहेत. मागच्या ४ दिवसांपासून जिल्ह्यात दुपारनंतर रोज पाऊस होत असल्याने खरिपाच्या पिकांचेही मोठे नुकसान होत आहे.

मॉन्सूनच्या परतीचा प्रवास २४ सप्टेंबरला राजस्थान आणि गुजरातच्या काही भागांतून सुरू झाला; परंतु परतीचा प्रवास काहीसा अडखळत सुरू आहे. सिंधुदुर्गात देखील मॉन्सूनच्या परतीचे वेध \लागले आहेत. सध्या कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात परतीच्या पावसाप्रमाणे पाऊस पडत असल्याचे चित्र आहे. कोकणातील सावंतवाडी, दोडामार्ग, कणकवली आणि वैभववाडीच्या पूर्वपट्ट्यात पावसाचा जोर वाढला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात बुधवार (ता.०३) पहाटे दाट धुके होते. यानंतर सकाळी कडक ऊन आणि ढगाळ वातावरण तयार झाल्याने हवेत दमटपणा आला आहे. त्यामुळे ऑक्टोबरच्या पहिल्याच आठवड्यात हीटच्या झळा बसू लागल्या. सकाळी दहा-अकरापासून अंगाची लाही- लाही होऊन घामाच्या धारा वाहत होत्या. उन्हाचे चटके देखील जाणवत आहेत. पहिल्याच आठवड्यात अशी परिस्थिती झाल्याने नागरिक धास्तावले आहेत. सायंकाळी जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार पाऊसही बरसत आहे.

नवरात्रोत्सवावर पावसाचे सावट

जिल्ह्यात सध्या पहाटे दाट धुके, दुपारपर्यंत कडक ऊन आणि सायंकाळी विजांच्या गडगडाटांसह पाऊस असे चित्र आहे. कोकण हवामान विभागाकडून रविवारपर्यंत (ता. ०६) काही भागात विजांच्या लखलखाटांसह पावसाचा अंदाज दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT