Cooperative societies Election : राज्यातील २९ हजार सहकारी संस्थांच्या निवडणूका लागणार, सहकार निवडणूक प्राधिकरणाचे आदेश

Cooperative societies Election 2024 : विविध कारणांनी रखडलेल्या राज्यातील २९ हजार सहकारी संस्थांच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे. याबाबत सहकारी निवडणूक प्राधिकरणाने आदेश दिले आहेत.
Cooperative Societies Elections
Cooperative Societies Electionsagrowon
Published on
Updated on

Pune News : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. याचदरम्यान सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिले आहेत. यामुळे गेल्या दोन एक वर्षांपासून रखडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणूका लागण्याची शक्यता आहे. पण येत्या काहीच दिवसात राज्यात विधानसभा निवडणुक घोषित होण्याची शक्यता आहे. या शक्यतेमुळे पुन्हा एकदा सहकारी संस्थांच्या निवडणूका लांबणीवर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याआधी निवडणुकीस पात्र असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका ३१ मे आणि ३० सप्टेंबर २०२४ रोजी निर्णय घेत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यावेळी शेतीची कामे आणि पावसाचं कारण देत जवळपास ८ हजार ३०५ सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. आता पावसाचा हंगाम संपला असून सहकारी संस्थांच्या निवडणूका लवकरच होण्याची शक्यता आहे.

Cooperative Societies Elections
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेच्या १२ जागांबाबत कोणतीही तडजोड नाही; मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची भूमिका

मात्र, आता या निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर त्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाईत किंवा निवडणुकीनंतर राज्यातील २९ हजार ४४३ सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल उधळलेला दिसेल.

सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आदेशानुसार राज्यस्तरावर अ वर्गातील ४२, ब वर्गातील १ हजार ७१६, क वर्गातील १२ हजार २५० आणि ड वर्गातील १५ हजार ४३५ अशा २९ हजार ४४३ सहकारी संस्थांचा समावेश आहे. तर पुणे जिल्ह्यातील २ हजार २२० आणि शहरातील ८२८ अशा ३ हजार ४८ सहकारी संस्थांच्या निवडणुका होतील. याबाबत प्राधिकरणाचे आयुक्त डॉ. अनिल कवडे यांनी आदेश काढले आहेत.

Cooperative Societies Elections
Vidhansabha Election 2024 : दिवाळी, अन्य सणांचा विचार करून निवडणुका

याआधी उच्च व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ज्या सहकारी संस्थेच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या. आता त्या सहकारी संस्था वगळून इतर इतर सहकारी संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया सुरू करावी लागणार आहे. तर ज्या स्थितीत प्रक्रिया रखडली होती. तेथूनच पुन्हा प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. ही प्रक्रिया १ ऑक्टोबर २०२४ सुरू करण्यात येणार आहे. तर अ आणि ब वर्गातील सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम महाराष्ट्र सहकारी संस्था निवडणूक नियम २०२४ मधील तरतुदीनुसार तयार करावा. तसेच तो प्राधिकरणाच्या मान्यतेसाठी सादर करावा, असे आदेशही कवडे यांनी दिले आहेत.

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलणार?

याच्या आधी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आणि त्यानंतर पाऊस, शेतीचे कामांच्या कारणांमुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा देखील होण्याची शक्यता आहे. या कारणाने पुन्हा एखदा सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रियादेखील पुढे ढकलण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com