Paddy Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पावसामुळे भातपीक कापणीत अडथळे

Paddy Crop : सध्या पडत असलेल्या पावसामुळे हळव्या पिकांच्या कापणीत अडथळा निर्माण झाला आहे.

Team Agrowon

Sindhudurg News : विजांच्या गडगडाटांसह जिल्ह्याच्या काही भागात मंगळवारी (ता. १) सायकांळी पावसाच्या सरी कोसळल्या. पूर्वपट्ट्यात पावसाचा जोर अधिक होता. सध्या पडत असलेल्या पावसामुळे हळव्या पिकांच्या कापणीत अडथळा निर्माण झाला आहे. दरम्यान बुधवारी (ता. २) सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून उकाडा प्रचंड वाढला आहे.

पहाटे धुके, दुपारपर्यंत कडक उन्हं आणि सायकांळी विजांच्या गडगडाटांसह पावसाच्या सरी असेच चित्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात आहे. पहाटेपासून जिल्ह्यात दाट धुके पसरले होते.

त्यानंतर सायकांळी चार वाजेपर्यंत कडक उन्हं होते. त्यानंतर सावंतवाडी, दोडामार्ग, कुडाळ तालुक्यांत विजांच्या कडकडाटांसह पावसाच्या सरी बरसण्यास सुरुवात झाली. तासाभरानंतर कणकवली, वैभववाडी तालुक्यांत देखील विजांच्या गडगडाटांसह पावसाच्या सरी पडण्यास सुरुवात झाली.

पूर्वपट्ट्यातील गावांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. जिल्ह्यात हळवी भातपिके परिपक्व झाली असून या पिकांच्या कापणीच्या तयारीत शेतकरी होते. परंतु पावसामुळे कापणीत अडथळा निर्माण झाला आहे.

दरम्यान जिल्ह्यात आज पहाटे देखील दाट धुके पसरले होते. परंतु त्यानंतर ढगाळ वातावरण आहे. काही भागात कडक उन्हं देखील आहे. ढगाळ वातावरण आणि कडक उन्हं यामुळे जिल्ह्यात उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. अंगाची लाही लाही होत असून घामाच्या धारा वाहत असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT