Vegetable Nursery  Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Nursery : सातत्यपूर्ण पावसामुळे भाजीपाला रोपांना मागणी रोडावली

Vegetable Sapling Sale : जोरदार पाऊस आणि कडक ऊन शेतकऱ्यांनी भाजीपाला रोपवाटिकांकडे पाठ फिरवली आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून रोपवाटिका चालकांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

Team Agrowon

Kolhapur News : बदलत्या वातावरणाचा भाजीपाला रोपवाटिकांना चांगलाच फटका बसत आहे. सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना भाजीपाला लागवड करता येत नसल्याची स्थिती आहे. जोरदार पाऊस आणि कडक ऊन शेतकऱ्यांनी भाजीपाला रोपवाटिकांकडे पाठ फिरवली आहे. लाखो रुपयांची गुंतवणूक करून रोपवाटिका चालकांना शेतकऱ्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. सततच्या पावसामुळे अद्याप शेतामध्ये पाणी साचले आहे.

परिणामी आणखी काही दिवस शेतकऱ्यांना भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. मॉन्सूनपूर्व पावसानंतर कडक ऊन आणि ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोगराईची भीती आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे शेतकरी भाजीपाला लागवडीकडे दुर्लक्ष करत आहे. वास्तविक मे महिन्याच्या अखेरपासून भाजीपाला रोपवाटिकांचा हंगाम सुरू होतो.

मात्र गेल्या अनेक वर्षात प्रथमच मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतामध्ये अद्याप पाणी आणि चिखलाचे साम्राज्य आहे. पुन्हा पावसाने हजेरी लावली नाही तर पंधरा दिवसांत शेतीत घात येणार आहे. यानंतर भाजीपाला लागवडीची शेतकऱ्यांची धांदल सुरू होण्याची आशा रोपवाटिका चालकांना आहे. गेल्या अनेक वर्षात प्रथमच मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर मॉन्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली याचा परिणाम शेती चक्रावर झाला आहे.

शेतामध्ये पाणी तुंबून राहिल्याने भाजपला लागवडीकडे शेतकऱ्यांचा म्हणावा तसा प्रतिसाद नाही. बदलत्या वातावरणात भाजीपाल्यावर रोगराईची भीती आहे. भाजीपाला रोपवाटिका चालकांनी वांगी, मिरची, कोबी, फ्लॉवर, टोमॅटो अशी रोपे तयार करून हंगामाची जोरदार तयारी केली आहे.

अनेक रोपवाटिका चालकांनी अगदी चार लाखांपासून आठ ते दहा लाखांपर्यंतची गुंतवणूक केली आहे. शिवाय पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या मॉन्सूनपूर्व पावसाने काही रोपवाटिका चालकांचेही नुकसान झाले आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच मॉन्सूनपूर्व पावसाने रोपवाटिका चालकांना फटका बसला आहे.

भाजीपाल्याच्या रोपांना मागणी कमी आहे. मात्र पंधरा दिवसांनंतर हंगाम जोरदारपणे होणार आहे. शेतीत वाफसा आल्यानंतर मागणी मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे. याची तयारी आम्ही करून ठेवली आहे. मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी रोपांची उपलब्धता केली आहे.
- शिवाजीराव कचरे, कचरे रोपवाटिका, तमदलगे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Inspection: जिल्हाधिकारी शेताच्या बांधावर; पीक पाहणी करून साधला संवाद

Sustainable Aviation Fuel Project: शाश्वत विमान इंधन निर्मिती प्रकल्प ‘नॅचरल’ उभारणार; बी. बी. ठोंबरे यांची माहिती

Crop Insurance Compensation: हवामान मापक यंत्रावरील नोंदणी ग्राह्य धरून पीकविमा परतावा द्या : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Railway Protest: रेल्वेचा निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार; संगमनेरकरांचा इशारा

Weekly Weather: महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या मार्गावर

SCROLL FOR NEXT