Farmer Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Ravikant Tupkar : आता गनिमी काव्याने आंदोलन : तुपकर

Ravikant Tupkar Protestसरकारसोबत चर्चा न करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याच्या नितीचा अवलंब करीत अधिक तीव्र आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी (ता. १९) दिला.

Team Agrowon

Nagpur News : सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. १९) रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत शिष्टमंडळाची झालेली चर्चा फिसकटली.

परिणामी, यापुढे सरकारसोबत चर्चा न करता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गनिमी काव्याच्या नितीचा अवलंब करीत अधिक तीव्र आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी (ता. १९) दिला.

सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्‍नांवर लक्ष वेधण्यासाठी तुपकर यांच्या नेतृत्वात हल्लाबोल मोर्चा विधान भवनावर नेण्याचे प्रस्तावीत होते. मंगळवारी गौंडखेरीपासून याला सुरुवात झाली. झीरो माइलनजीक मोर्चाला पोलिसांनी अडवित मोर्चेकऱ्यांना ताब्यात घेतले. मोर्चेकऱ्यांची रवानगी सीआयडी कार्यालयात करण्यात आली होती.

दरम्यान, तुपकर यांनी चर्चेसाठी न जाता शेतकऱ्यांना शासनासोबत चर्चेसाठी पाठविले. त्यामध्ये कर्जफेडीकरिता अवयव विक्रीसाठी काढणाऱ्या हिंगोली जिल्ह्यातील गजानन कावरखे यांचाही समावेश होता. परंतु कृषिमंत्री व शिष्टमंडळाचे कोणत्याच विषयावर एकमत झाले नाही. त्यावरूनच सरकार शेतकऱ्यांप्रती गंभीर नसल्याचा आरोप करीत शिष्टमंडळाने चर्चास्थळावरून काढता पाय घेतला.

शेतकऱ्यांच्या जखमांवर बोट ठेवण्याचे काम कृषिमंत्र्यांनी केले. आम्ही अवयव विकायला मुंबईला गेलो होतो, असे त्यांना सांगताच माझे पण अवयव विकत घ्या. अशी मिस्कील टिप्पणी कृषिमंत्र्यांनी केली. त्यावरूनच ते शेती आणि शेतकऱ्यांप्रति गंभीर नसल्याचे सिद्ध होते.
गजानन कावरखे, हिंगोली, शिष्टमंडळात सहभागी शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT