Nagpur News : शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्राला पनवती लागली असा हल्लाबोल शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी नागपूर येथे हल्लाबोल मोर्चेवेळी केला. तसेच जोपर्यंत न्याय मिळणार नाही तो पर्यंत थांबणार नाही अशीही भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यांच्या नेतृत्वात मंगळावारी (१९ रोजी) नागपूर येथे विधानभवनावर हल्लाबोल काढण्यात आला होता.
यावेळी तुपकर म्हणाले, महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. सोयाबीन, कापसाचे दर पडले आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलाच आक्रमक झाला आहे. यावेळी हजारो शेतकऱ्यांसह तुपकरांनी विधानभवनावर धडक देत सोयाबिन आणि कापसाला दरवाढ देण्याची मागणी सरकारकडे केली.
यादरम्यान तुपकर यांचा मोर्चा पोलिसांकडून अडविण्यात आला. त्यावेळी तुपकर आणि पोलिसांच्यात बाचाबाची झाली. तसेच त्यांनी, "तुम्हाला आमच्यावर काय कारवाई करायची ती करा. आमच्यावर गुन्हे दाखल करा, आम्हाला फासावर चढवा, सुळावर चढवा, पण आम्हाला आत जाऊ द्या", अशी मागणी पोलिसांकडे केली. तसेच, "हे विधानभवन आमच्या पैसातून तयार झाले आहे. आम्ही ज्यांना निवडणून दिलं आहे. ते आत आहेत. मग आम्हाला कोणत्या नियमानुसार येथे आडवलं जातय", असा सवाल देखील तुपकरांनी पोलिसांना केला.
"एकिकडे भ्रष्टाचाऱ्यांना पोलिस संरक्षणात न्यायचं आणि हक्क मागणाऱ्या शेतकऱ्यांना हाकलायचं ही सरकारची भूमिका बरोबर नाही" असे म्हणत आपण विधानभवनात जाण्यावर ठाम असल्याचेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी सोयाबिनला बाजारपेठेत कमीत कमी ९ हजार तर कापसाला १२ हजार ५०० भाव मिळायला हवा अशी मागणी केली आहे.
राज्यात पडलेले सोयाबीन, कापूस, कांद्याचे भाव यावरून शेतकरी आक्रमक झाला आहे. त्यांच्याकडून शेतमालाला योग्य भाव मिळावा अशी सतत मागणी होत आहे. मात्र सरकारकडून यावर कार्यवाही होताना दिसत नाही. त्यामुळे तुपकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी (१९ रोजी) हिवाळी अधिवेशनावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी हजारो शेतकऱ्यांसह त्यांच्या पत्नी शर्वरी तुपकर या देखील आंदोलनात दिसल्या. यावेळी विधानभवन परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले आहे.
यावेळी शेतकऱ्यांना आपल्या व्यथा मांडताना आमच्याकडे शेती करायला आता पैसे नाहीत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. कर्ज फेडायला पैसा नाही. सोयाबिन, कापूस, कांद्याला दर नाही. आमचं घर, शेत बँकेकडे गहाण आहे. म्हणून आत्महत्या करून मरण्यापेक्षा आम्ही आमचे अवयव विकायला काढल्याचे आंदोलक शेतकऱ्याने सांगितले.
येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, पिकविम्याची १०० टक्के अंतिम रक्कम लवकर मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.