Ravikant Tupkar : विधानभवनावर हल्लाबोल करणारे तुपकर पोलिसांच्या ताब्यात

Ravikant Tupkar Protest : सोयाबीन आणि कापसाच्या दरावरून नागपुरच्या विधानभवनावर हल्लाबोल करणाऱ्या रविकांत तुपकर यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Ravikant Tupkar
Ravikant TupkarAgrowon
Published on
Updated on

Nagpur News : सोयाबीन आणि कापसाच्या दरावरून नागपुरच्या विधानभवनावर हल्लाबोल करणाऱ्या रविकांत तुपकर यांना मंगळवारी (१९ रोजी) नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर तुपकरांनी सरकारवर जोरदार टीका केली. तुपकर म्हणाले, "हे सरकार शेतकऱ्यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांना न्याय मागण्याचा अधिकार हिरावत आहे", असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर केला.

पुढे तुपकर म्हणाले, "या सरकारला शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडण्याचा अधिकार नाही. शेतकऱ्यांना न्याय देता येत नसेल तर आंदोलन तरी चिरडू नका, सरकारला हे महागात पडेल." असा इशारा त्यांनी दिला. तसेच "यापुढे मतं मागायला गावात या तुमची जागा शेतकरी दाखवल्याशिवाय राहणार नाही," असेही तुपकर म्हणाले.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar : केंद्रीय वाणिज्य मंत्र्यांसोबत बैठकीच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकरांचे आंदोलन स्थगित

तसेच यावेळी तुपकरांनी, "सरकारचा निषेध करताना, सरकारला आंदोलन दाबता येणार नाही. आम्ही काही दहशतवादी आहोत का? आम्ही का कसाब आहोत का? अटक करताना सरकारला लाज वाटत नाही का?" असे प्रश्न उपस्थित केले. यावेळी 'सोयबीन, कापसाला भाव द्या', अशी मागणीही तुपकरांनी केली.

Ravikant Tupkar
Ravikant Tupkar: 'दाम नाही तर मागे नाही'; तुपकरांचा विधानभवनावर हल्लाबोल

दरम्यान, या आंदोलनात तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर सहभागी होत्या. चोर, दहशतवाद्यांप्रमाणे हे सरकार शेतकऱ्यांना अटक करत आहे. याचा निषेध करत असल्याचे शर्वरी तुपकरांनी आरोप केला. त्या म्हणाल्या, "विधिमंडळ प्रश्न मांडण्यासाठी असताना प्रतिनिधीच प्रश्न मांडत नसतील तर आम्हालाच प्रश्न मांडावे लागतील. आम्हाला न्याय मिळाला नसून हा लढा सुरूच राहील." अशी भूमिका त्यांनी मांडली.

येलो मोझॅक, बोंडअळी व पावसात खंड पडल्याने झालेल्या नुकसानीपोटी १०० टक्के नुकसान भरपाई मिळावी, सोयाबीन-कापसाला दरवाढ मिळावी, पिकविम्याची १०० टक्के अंतिम रक्कम लवकर मिळावी, यासह अन्य मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com