Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Outstanding Loan : थकित कर्जप्रकरणी भुजबळ बंधूंना नोटीस

District Bank Update : भुजबळ कुटुंबीयांच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या साखर कारखान्याकडील ५१ कोटी ६६ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी बँक अधिकाऱ्यांनी कारखाना स्थळावर जात मागणी नोटीस चिकटवली.

Team Agrowon

Nashik News : आर्थिक अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेला सावरण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्यानंतर काही दिवसांतच जिल्हा बॅंकेने हिरे कुटुबीयांच्या रेणुका सूतगिरणीवर कारवाई केली होती. यापाठोपाठ आता बॅंकेने भुजबळ यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

भुजबळ कुटुंबीयांच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या साखर कारखान्याकडील ५१ कोटी ६६ लाख रुपयांच्या थकबाकीसाठी बँक अधिकाऱ्यांनी कारखाना स्थळावर जात मागणी नोटीस चिकटवली. कारखान्याचे संचालक असलेल्या समीर व पंकज या भुजबळ बंधूंना देखील नोटीस बजावण्यात आली आहे.

परवाना धोक्यात सापडल्यानंतर जिल्हा बॅंकेने वसुलीसाठी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. याचाच भाग म्हणून बॅंकेने भुजबळ बंधूंना नोटीस बजाविली आहे. भुजबळ कुटुंबीयांनी दाभाडी येथील गिरणा सहकारी साखर कारखाना विकत घेतला आहे. याच आर्मस्ट्राँग इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. (गिसाका) या साखर कारखान्यासाठी त्यांनी जिल्हा बँकेकडे १० नोव्हेंबर २०११ ला ३० कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली होती.

बँकेने ३ जानेवारी २०१२ ला कर्ज मंजूर केले. कारखान्याने ३० कोटींपैकी १८ कोटींची नियमित कर्ज परतफेड केली. परंतु २०१३ पासून कारखान्याकडे १२ कोटी १२ लाख थकित मुद्दल व व्याज ३९ कोटी ५४ लाख असे एकूण ५१ कोटी ६६ लाख रुपये थकित आहेत. त्यातच बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळल्याने थकित कर्ज वसुलीसाठी जिल्हा बँकेने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार आर्मस्ट्राँगकडील थकित रक्कम वसुलीसाठी जिल्हा बँकेने प्राधिकृत केलेले अधिकारी गोपीचंद निकम, गोरख जाधव यांच्यासह केंद्र कार्यालयाकडील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरफेशी कायद्यांतर्गत कारखाना कार्यस्थळावर जाऊन मागणी नोटीस चिकटवली.

कारखान्याचे संचालक असलेले पंकज भुजबळ, समीर भुजबळ यांच्यासह सत्येन अप्पा केसरकर यांनाही नोटीस बजावली आहे. तीन वर्षांपासून बँकेची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे बँकेने थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी होणार लिलाव

जिल्हा बॅंकेने झोडगे येथील (कै) संदीप सुधाकर सोनजे औद्योगिक सहकारी संस्थेकडे १ कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यांनीही थकबाकी न भरल्यामुळे त्यांच्यावर लिलावाची कारवाई सुरू आहे. त्याअंतर्गत येत्या रविवारी (ता. २१) जानेवारीला संस्थेच्या मालमत्तेचा लिलाव होत आहे. ही कारवाई बिगर शेती विभागाने केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Damage : मुसळधार पावसामुळे भातपीक कुजण्याचा धोका

Zero Tillage: मातीची सुपीकता वाढवणारी शून्य मशागत खर्चाची बचत कशी करते

Crop Damage Survey : चाकूर तालुक्यात नुकसानीचे पंचनामे सुरू

bamboo Plantation : ​रत्नागिरीत १० हजार हेक्टरवर बांबू लागवड करणार

Agrowon Podcast: हिरवी मिरची टिकून; गव्हाला मागणी कायम, भेंडीला चांगला उठाव, कोथिंबीरचे भाव स्थिरावले, तर सूर्यफुलाच्या भावात मंदी

SCROLL FOR NEXT