Shaktipeeth Highway Agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ नसून हा ‘सक्तीपीठ’ महामार्ग : देशमुख

Farmers Protest : राज्यात कोणाकडून ही मागणी नसताना आणि पर्यायी मार्ग उपलब्ध असताना सरकार शक्तिपीठ महामार्गाचा घाट का घालत आहे, हे समजत नाही.

Team Agrowon

Latur News : राज्यात कोणाकडून ही मागणी नसताना आणि पर्यायी मार्ग उपलब्ध असताना सरकार शक्तिपीठ महामार्गाचा घाट का घालत आहे, हे समजत नाही. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने अधिग्रहण करण्याचे प्रयत्न होत आहेत.

त्यामुळे हा शक्तिपीठ नसून सक्तीपीठ महामार्ग असल्याची चर्चा राज्यात सुरू आहे. हा प्रकार ताबडतोब थांबवावा, अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी सोमवारी (ता. सात) पुरवणी मागण्यावरील चर्चेदरम्यान केल्या.

केंद्राने आणि राज्य शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे राज्यातील शेतकरी देशोधडीला लागला आहे, शेतीपूरक उद्योगी अडचणीत आले आहेत, बैल नाहीत म्हणून औतला जुंपून घेणाऱ्या हाडोळती येथील अंबादास पवार या शेतकऱ्याची काल भेट घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या ज्या व्यथा सांगितल्या त्या मन सुन्न करणाऱ्या आहेत.

यामुळे केंद्राशी चर्चा करून कृषी धोरणात आमूलाग्र बदल करावे लागणार आहेत. राज्यातील शेतकरी आणि शेतीवर अवलंबून असलेल्या घटकांना ऊर्जित अवस्थेत आणावे, लातूर मधील डाळ उद्योगासारखे कृषी मालावर प्रक्रिया करणारे महाराष्ट्रातील उद्योग चांगले चालावेत म्हणून विशेष प्रयत्न करावेत. शेतीमालाला योग्य भाव मिळवून द्यावा, शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळायलाच हवा.

केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणामुळे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाला भाव मिळत नाही. परिणामी शेतकरी देशोधडीला लागत आहे, सोयाबीन तूर उत्पादन करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्‍वासन देणारे सत्ताधारी पक्षाचे नेते या विषयावर आता काहीच बोलत नाहीत, ही अत्यंत गंभीर बाब आहे, असे आमदार देशमुख म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance Scheme : बिगर कर्जदार शेतकऱ्यांना विमा अर्जासाठी अंतिम मुदत

Crop Insurance Payment : विमा परतावा खात्यात जमा होण्यास नांदेडमध्ये सुरुवात

NAFED Onion Scam : कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत लढा देणार

Rain Update : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे जोरदार कमबॅक

Kharif Sowing : सोयाबीन, सूर्यफूल क्षेत्रात घट

SCROLL FOR NEXT