Sugarcane FRP Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : पहिल्या हप्त्याचा तिढा ‘जैसे थे’च

Sugarcane Season : पहिली उचल तीन हजार तीनशे देण्यात या प्रमुखसह अन्य मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती संघर्षाचा तयारीत आहेत.

Team Agrowon

Nanded News : ऊसाच्या दराबाबतचा तिढा सोडवण्यासाठी व उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी साखर कारखानदार, शेतकरी प्रतीनिधी व ऊस उत्पादक शेतकरी यांची जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते.

पण कारखान्याकडून कुठलीच सकारात्मकता दाखवली नसल्यामुळे ऊस दर आणि पहिली उचल याबाबत कुठलाच तोडगा निघाला नाही. जिल्हाधिकारी यांनी पुढील बैठक (ता.१३) डिसेंबरला आयोजित केली आहे. त्यामुळे येणाऱ्या बैठकीत ऊस उत्पादकांच्या मागणीकडे दुर्लक्ष झाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

पहिली उचल तीन हजार तीनशे देण्यात या प्रमुखसह अन्य मागण्यांसाठी ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समिती संघर्षाचा तयारीत आहेत. मराठवाड्यातील बहुतांश कारखानदारांनी पहिली उचल अडीच हजार जाहीर केली असून त्याप्रमाणे ऊसाचे देयके अदा करण्यात येत आहेत. यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊन महिना झाला असून अद्याप ऊसाच्या दराबाबत तोडगा न निघाल्याने शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकरी संघर्षाच्या पवित्र्यात आहेत.

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी संघटना, सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक काही दिवसांपूर्वी पार पाडली. या बैठकीत ऊसदरासाठी तिव्र आंदोलन करण्यात निर्धार करण्यात आला. या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून जिल्ह्याधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले होते.

या निवेदनाची दखल घेऊन कारखाना प्रशासन व शेतकरी संघटना व ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीचे शुक्रवारी आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी अभिजित राऊत, नांदेड विभागाचे साखर प्रादेशिक सहसंचालक, विविध कारखान्याचे कार्यकारी संचालक तथा प्रतिनिधी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Suicides: आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात ‘एसएओ’ पद रिक्‍त

Crop Insurance: मुदतवाढीनंतरही पीकविम्याच्या अर्जांमध्ये ५० टक्क्यांची घट

Agri Student Protest: कृषी पदवीधारकांचा परभणीत आक्रोश मोर्चा

Solapur Rain: सोलापूर जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

Hingoli Heavy Rain: हिंगोली जिल्ह्यातील दोन मंडलांमध्ये अतिवृष्टी

SCROLL FOR NEXT