Ear Tagging Agrowon
ॲग्रो विशेष

Animal Ear Tagging : यापुढे ‘इअर टॅगिंग’शिवाय जनावरांची खरेदी-विक्री नाही

Animal Buy and Sale Update : येत्या १ जूनपासून ‘इअर टॅगिंग’ नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : येत्या १ जूनपासून ‘इअर टॅगिंग’ नसलेल्या जनावरांची खरेदी-विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. त्यामुळे पशुपालकांनी आपल्या पशुधनाला कर्ण बिल्ले लावून घ्यावेत. त्यासाठी जवळच्या पशुवैद्यक दवाखान्यात संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले.

जनावरांच्या कानात टॅग नसताना त्यांची खरेदी-विक्री होत असल्यास त्यास प्रतिबंधित करावे, असे आदेश स्वामी यांनी दिले. केंद्रामार्फत नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (एनडीएलएम) अंतर्गत भारत पशुधन प्रणाली कार्यान्वित केली आहे. या प्रणालीत पशुधनास ‘इअर टॅगिंग’ केल्यानंतर सर्व नोंदी ऑनलाइन करून घेण्यास मदत होईल.

पशुवैद्यकीय दवाखान्यांतील पशुवैद्यक हे पशुपालकांच्या गोठ्यात जाऊन जनावरांच्या ‘इअर टॅगिंग’च्या नोंदी करून घेतील. त्यात जनावरांच्या जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण, औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतर या बाबींचा समावेश आहे.

या प्रणालीवर जिल्ह्यातील सर्व पशुधनाची प्रजनन आरोग्य, मालकी हक्क, जन्म-मृत्यू आदी सर्व माहिती मिळेल. त्यासाठी पशुधनाच्या कानास टॅग लावून भारत पशुधन प्रणालीमध्ये नोंदणी आवश्यक आहे, असे जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. प्रदीप झोड यांनी सांगितले.

काय आहे ‘इअर टॅगिंग’?

‘इअर टॅगिंग’मध्ये जनावरांच्या कानात पिवळ्या रंगाचा एक प्लॅस्टिक बिल्ला (टॅग) लावला जातो. त्यात त्या जनावरांची ओळख दर्शविणारा १२ अंकी क्रमांक असतो. या क्रमांकाच्या आधारे, पशुवैद्यकीय दवाखान्यातील अधिकारी त्या जनावरांवर केलेल्या उपचार, लसीकरणाबाबत विविध नोंदी ऑनलाइन घेतात.

या नोंदी भारत पशुधन पोर्टलवर अपलोड होत असतात. यापुढे पशुपालकांनी जनावरांची व्यवस्थित काळजी घेणे, विविध आजार, साथीच्या रोगापासून संरक्षण देणे, चोरी, तस्करीपासून संरक्षण करणे, शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी, गैरप्रकारांना आळा घालणे अशा विविध बाबींसाठी या टॅगिंगमुळे फायदा होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT