Rural Education Agrowon
ॲग्रो विशेष

Education Board Maharashtra : शेतकरी कुटुंबातील पाल्यांभोवती अशैक्षणिक साहित्य खरेदीचा फास

Rural Education : शैक्षणीक सत्राला सुरुवात होण्यापूर्वी शिक्षण मंडळाने निश्‍चित केलेल्या पुस्तकांशिवाय इतर प्रकाशकांच्या पुस्तकाची आणि ती देखील ठरावीक दुकानातूच खरेदीची सक्‍ती अनेक शाळा करतात.

Team Agrowon

Amaravati News : शैक्षणीक सत्राला सुरुवात होण्यापूर्वी शिक्षण मंडळाने निश्‍चित केलेल्या पुस्तकांशिवाय इतर प्रकाशकांच्या पुस्तकाची आणि ती देखील ठरावीक दुकानातूच खरेदीची सक्‍ती अनेक शाळा करतात.

शेतकरी पृष्ठभूमी असलेल्या अनेक पालकांना हा आर्थिक भार असह्य होतो. त्यामुळे अशाप्रकारची सक्‍ती शाळांनी करू नये, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा अमरावती शिक्षण विभागाने दिला आहे.

आर्थिक अडचणीमुळे अनेक पालकांना सक्‍तीच्या शैक्षणिक साहित्याची खरेदी करता आली नाही. परिणामी, नैराश्‍यातून त्यांच्या पाल्यांनी भावनिक चिठ्ठी लिहीत आत्महत्या केल्याचे प्रकार राज्यात यापूर्वी घडले आहेत. काही पालकांना शैक्षणिक शुल्क चुकविता आले नाही तर काहींना इतर प्रकाशकांच्या गैरवाजवी पुस्तकांची खरेदी आपल्या पाल्यांना करून देता आली नाही.

आत्मघाताचे यातील बहुतांश प्रकार शेतकरी कुटुंबात घडले होते. त्याचीच दखल घेत (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड. नीलेश हेलोंडे (पाटील) यांनी शिक्षण विभागाला पत्र लिहीत शालेय शिक्षण मंडळाने निश्‍चित केलेल्या पुस्तकांव्यतिरिक्‍त इतर प्रकाशकांच्या पुस्तकांची सक्‍ती करण्यात येऊ नये, असे निर्देश दिले होते.

यामुळे आर्थिक झळ सोसणाऱ्या शेतकरी पाल्यांना अडचणींचा सामना करावा लागतो, असेही त्यांनी पत्रात नमूद केले होते. या पत्राची दखल घेत अमरावती जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) डॉ. अरविंद मोहरे यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना अशाप्रकारची सक्‍ती न करण्याचे आदेशित केले आहे.

अभ्यासक्रमाच्या पुस्तकाशिवाय इतर कोणत्याही पुस्तकांची खरेदी आणि ती देखील विशिष्ट दुकानात करावी, असे प्रकार घडल्यास सक्षम प्राधिकरणाकडे अशा शाळांचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्याआधारे कठोर कारवाईची शिफारस केली जाईल, असेही अरविंद मोहरे यांनी त्यांच्या आदेशात बजावले आहे.

उन्हाळी सुट्ट्यांनंतर शाळा लवकरच भरणार आहेत. या काळात शैक्षणिक संस्था त्यांच्या स्वार्थासाठी शालेय साहित्या व्यतिरिक्‍त इतर गरज नसलेल्या बाबींची सक्‍ती करतात. शेतकरी कुटुंबातील पाल्यांना हा आर्थिक भार असह्य होतो. त्यामुळे अशी सक्‍ती करण्यात येऊ नये, असे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.
ॲड. नीलेश हेलोंडे पाटील, अध्यक्ष, (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wild Vegetables: आहारात हव्यात आरोग्यदायी रानभाज्या

Water Conservation: श्रद्धा-सबुरी संस्थेने रुजविला जलसंधारणाचा पॅटर्न

Ganeshotsav 2025 : 'साम'च्या गणरायाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आरती

Global Startup: स्टॅनफर्ड विद्यापीठ : संशोधन, नवोन्मेषाचा जागतिक दीपस्तंभ

Weekly Weather: उघडिपीसह हलक्या पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT