Ind-Us Trade Relation Agrowon
ॲग्रो विशेष

Ind-US Trade Conflict : शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार: पंतप्रधान मोदी यांचे डोनाल्ड ट्रम्पला उत्तर

Narendra Modi On Trump Tariff : मला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्हाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पण शेतकऱ्यांसाठी भारत ही किंमत मोजण्यास तयार आहे.

Anil Jadhao 

Pune News : देशातील शेतकऱ्यांचे हीत हे आमचे पहीले प्राधान्य आहे. शेतकऱ्यांसाठी देश कोणताही किंमत मोजायला तयार आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या हिताशी कुठलीही तडजोड करणार नाही. डेअरी उत्पादक तसेच मत्स उत्पादकांचे हीत देश जोपासणार आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना इशारा दिला.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर बुधवारी (ता.६) अतिरिक्त २५ टक्के आयात शुल्क जाहीर करून हे २१ दिवसांनंतर लागू होणार आहे. म्हणजेच भारतावर एकूण ५० टक्के आयात शुल्क लागू होणार आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करतो आणि यातून मिळालेला पैसा रशिया युक्रेनमध्ये युध्द करण्यासाठी वापरतो, असा दावा करत ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला.

प्रत्यक्षात भारतच नाही तर अमेरिका, युरिपियन युनियन टर्कीही रशियात आयात करते. तर चीन रशियाच्या तेलाचा सर्वात मोठी खरेदीदार आहे. त्यामुळे केवळ भारतावरच या कारणावरून शुल्क लावण्याचे केवळ कारण आहे, खरे तर ट्रम्प यांना भारतावर आपल्या मर्जीप्रमाणे करार करण्यासाठी दबाव वाढवायचा आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या या दबावतंत्राला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. दिल्ली येथे आज (ता.८) एम एस स्वामिनाथन शताब्दी आंतरराष्ट्रीय परिषदेत पंतप्रधान मोदी बोलत होते. त्यांनी पहिल्यांदा अमेरिकेच्या दबावाला उत्तर दिले

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ मला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आम्हाला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. पण शेतकऱ्यांसाठी भारत ही किंमत मोजण्यास तयार आहे.

शेतकऱ्यांचे हीत हे आमचे प्रथम प्राधान्य आहे. शेतकरी, दूध उत्पादक, मच्छीमार यांच्या हिताशी आम्ही तडजोड करणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी काम करत आहे. त्यासाठी विविध योजना आणि मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे.”

अमेरिका सातत्याने भारतावर आपली शेतीमाल आणि डेअरी उत्पादनांची बाजारपेठ अमेरिकेसाठी खुली करावी यासाठी दबाव आणत आहे. द्वीपक्षीय व्यापर करारात हे क्षेत्र खुले करण्यासाठी अमेरिका आग्रही आहे तर भारत याला विरोध करत आहे.

त्यामुळे व्यापार करारासाठी चर्चेच्या ५ फेऱ्या झाल्या तरी तोडगा निघाला नाही. आता डोनाल्ड ट्रम्प भारतावर अशा पध्दतीने दबाव वाढवत आहे. परंतु पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांच्या दबावाला उत्तर देत भारताची भुमिका जाहीर केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Gulabrao Patil: शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना व्हायला नको, गुलाबराव पाटलांचं वादग्रस्त वक्तव्य, शेतकरी नेत्यानं चांगलंच सुनावलं

Farmer Loan Waive : कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार?

Marathwada Rain Update : मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांतील १४३ मंडलांत हलका ते मध्यम पाऊस

Poor Seed Germination: ‘महाबीज’च्या सोयाबीनची उगवणच नाही

Loan Waiver Eligible List: नांदेड जिल्ह्यात कर्जमाफीच्या ९६ हजार पात्र यादी प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT