Agriculture Pump Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Water Pump : ‘माणिकपुंज’मधून पाणीउपसा करणाऱ्या नऊ मोटारी जप्त

Motor Pump Seized : माणिकपुंज धरणावर असलेल्या बेकायदा पाणीउपसा करणाऱ्या आठ मोटारी जप्त केल्याने खळबळ उडाली.

Team Agrowon

Nashik News : तालुक्यात पिण्याच्या पाण्याचे संकट भीषण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी (ता. १९) दुपारी तहसीलदार सुनील सैंदाणे यांनी थेट धडक कारवाई करीत माणिकपुंज धरणावर असलेल्या बेकायदा पाणीउपसा करणाऱ्या आठ मोटारी जप्त केल्याने खळबळ उडाली.

पंचायत समिती आवारात आढावा बैठकीला उपस्थित तलाठी, ग्रामसेवकांचा ताफा सोबत घेऊन तहसीलदारांनी थेट माणिकपुंज धरण गाठले. त्यांच्यासोबत गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, महावितरणचे बाणगाव उपविभागीय अभियंता श्री. पाटील, पाटबंधारे विभागाचे श्री. शिंदे यांच्यासह पंचक्रोशीतील तलाठी, ग्रामसेवक, कोतवाल, धरणावरील कर्मचाऱ्यांचा समावेश होता. अचानक शासकीय वाहनांचा मोठा ताफा धरणस्थळावर आल्याने मोठी धांदल उडाली.

धरणावरील पाणी पिण्यासाठी आरक्षित असून, अवैध उपसा होऊ नये, असे आदेश सप्टेंबरमध्ये काढण्यात आले होते. त्या वेळी धरणाच्या पूर्व भागातील रोहित्र बंद करण्यात आली होती. मात्र, पश्चिमेच्या बाजूने असलेल्या भागात दोनशेहून अधिक उपसा करणाऱ्या मोटारी व पाइपलाइनचे जाळे ‘जैसे थे’ होते.

ऑक्टोबरमध्ये धरणक्षेत्रात पाऊस झाल्याने एकूण २७५ दशलक्ष घनफूट साठा जलाशयात शिल्लक होता. त्यात दिवसेंदिवस घट होत तो २०० दशलक्ष घनफूटपर्यंत आला. जलाशयाची पातळी घसरल्याने टंचाई काळात पाणी जूनपर्यंत पुरविण्याचे आव्हान यंत्रणेपुढे उभे राहिले होते. तहसीलदार सैंदाणे महिन्यापूर्वी नांदगावी रुजू झाले आणि टंचाईच्या मुकाबल्यासाठी पाऊल उचलले.

सध्या तालुक्यात व २२२ वाड्या-वस्त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. तालुक्यातील जलसाठा असलेले माणिकपुंज धरण एकमेव असल्याने यापुढे अवैध उपसा होणार नाही, यासाठी कारवाई करण्यात आला. ९ मोटारी जप्त करण्यात येऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
सुनील सैंदाणे, तहसीलदार, नांदगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sowing Season: देशात मागील वर्षीच्या तुलनेत पेरणीला वेग; मॉन्सूनची शेतकऱ्यांना साथ

Banana Cluster : नांदेडमध्ये ‘केळी’साठी क्लस्टर मंजुरीच्या आशा पल्लवित

Flower Export : निर्यातक्षम फूल उत्पादकांचा हब होण्यासाठी मदत करणार

Crop Insurance Scheme : नांदेडला पीकविमा योजनेत सात लाख २३ हजार अर्ज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहीणींना रक्षाबंधनाच्या आधीच मिळणार 'गिफ्ट'; सरकार खात्यात पैसे जमा करणार 

SCROLL FOR NEXT