Crop Loan Distribution Irregularities  Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Distribution Irregularities : कर्जवाटपातील अनियमितता! नऊ निरीक्षकांना ५० हजारांचा दंड

Financial Misconduct : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निरीक्षकांनी धोरणापेक्षा दोन ते पाच हजार रुपये जादा पीककर्ज वाटप केल्याचे ऑडिटमध्ये लक्षात आले.

Team Agrowon

Yavatmal News : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निरीक्षकांनी धोरणापेक्षा दोन ते पाच हजार रुपये जादा पीककर्ज वाटप केल्याचे ऑडिटमध्ये लक्षात आले. निरीक्षकांनी जादा वाटपाची रक्कम सभासदांकडून वसूल करून भरणाही केला. यानंतरही बँकेने तब्बल नऊ निरीक्षकांना प्रत्येकी ४० ते ५० हजार रुपयांचा दंड ठोठावल्याने कर्मचाऱ्‍यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ओलित तसेच कोरडवाहू क्षेत्रासाठी पीककर्ज वाटपाची हेक्टरी मर्यादा निश्‍चित आहे. जमिनीच्या प्रकारानुसार शेतकऱ्यांना पीककर्ज दिले जाते. ही प्रक्रिया दरवर्षीच असून यंदाही याच पद्धतीने पीककर्ज वाटप केले गेले. काही प्रकरणामध्ये धोरणापेक्षा सातबारानुसार दोन ते पाच हजार रुपये जादा पीककर्जाचे वाटप करण्यात आले.

हा प्रकार बँकेच्या ऑडिटमध्ये लक्षात आला. यानंतर संबंधित निरीक्षकांनी जादा रक्कम सभासदांकडून वसूल केली. रक्कमेचा भरणा शाखेत करून घेतला. मात्र, नंतरही १० हजार रुपये प्रति संस्था या पद्धतीने तब्बल ९ निरीक्षकांना दंड ठोठावण्यात आला आहे. ९ पैकी काही निरीक्षकांना ४० तर काहींना ५० हजार रुपये दंडाचे पत्र मुख्य शाखेतून निर्गमित करण्यात आले आहे.

दंडाची रक्कम संबंधितांच्या पगारातून वळती केली जाणार आहे. या प्रकारामुळे जिल्हा बँकेतील कर्मचाऱ्‍यांमध्ये नाराजीचा सूर असून असंतोष पसरला आहे. याच मुद्यावर कर्मचारी संघटनेने संचालकांची भेट घेतली. अशा पद्धतीने दंड करू नये, अशी विनंती केली आहे.

पुसद विभाग ‘नील’ कसा?

पुसद विभागातील काही शाखेमध्ये गैरव्यवहार झाल्याचे यापूर्वी उघड झाले आहे. ही रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याचे शिक्कामोर्तब ‘ऑडिट’मध्येही झाले आहे. मात्र, पीककर्ज वाटपात एकाही सभासदाला जादा वाटप झाले नसल्याचा अहवाल आहे. यामुळे निरीक्षक तसेच कर्मचाऱ्‍यांना आश्‍चर्याचा धक्का बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

PM Surya Ghar Yojana: सौरऊर्जेतून घरगुती, कृषीला शाश्‍वत वीजपुरवठा

Solar Agriculture Pump: सौरपंपासाठी शेतकऱ्यांच्या नशिबी रखडपट्टीच

Crop Loan: कर्ज पुनर्गठनाची अंमलबजावणी रखडली

Tomato Late Blight: टोमॅटो पिकावरील उशिराने येणारा करपा नियंत्रणाचे सोपे उपाय

Nanded Degloor Expressway: नांदेड–देगलूर ग्रीनफिल्ड द्रुतगती महामार्गाला मिळणार गती

SCROLL FOR NEXT