Nilesh Lanke  Agrowon
ॲग्रो विशेष

Nilesh Lanke : दूध आणि कांदा दरवाढीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर खा. लंकेंचा मोर्चा; कार्यकर्ते व पोलिस भिडले!

Dhananjay Sanap

दूध आणि कांदा दरासाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या आंदोलना दरम्यान निलेश लंके यांचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात बाचाबाची झाल्याचा प्रकार प्रकार घडला आहे. लंके यांनी दूध आणि कांदा दरवाढीसाठी शुक्रवारी (ता.५) जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावर आणि बैलगाडी घेऊन जनआक्रोश मोर्चा काढला.

मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यावर मात्र लंके यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात पोलिसांनी आडवलं. त्यामुळे लंके यांचे कार्यकर्ते आणि पोलिस यांच्या बाचाबाची झाली. त्यानंतर लंके यांच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन केलं.

मागील वर्षभरापासून केंद्र आणि राज्य सरकारनं दूध आणि कांदा उत्पादकांच्या मेहनतीवर पाणी फेरलं आहे. त्यामुळे शेतकरी जेरीस आले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या दरम्यानच खा. निलेश लंके यांनी दूध आणि कांदा प्रश्नावर आंदोलन करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार लंके यांनी मोर्चा काढला आहे. यामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले असून जिल्हाधिकारी कार्यालयावर जनावरे घेऊन धडकले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Village Story : खपली

Processing Industry : प्रक्रिया उद्योगाला मिळाली महिलांची साथ

Weekly Weather : राज्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता

Retreating Monsoon : परतीचा पाऊस थांबायचे नावच घेईना

Khandesh Rain : पावसामुळे खानदेशातील प्रमुख नद्या झाल्या प्रवाही

SCROLL FOR NEXT