Onion Varieties Developed agrowon
ॲग्रो विशेष

Onion Varieties Developed : नाशिकच्या राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन केंद्राकडून कांद्याचे नवीन वाण विकसित

Nashik Agriculture Onion : केंद्र सरकारकडून या वाणाला मान्यता दिली असून लवकरच त्यास नाव देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर विशेष बैठक होणार असल्याची माहिती संशोधकांकडून देण्यात आली.

sandeep Shirguppe

National Horticulture Research Centre Nashik : खरीप हंगामात कमी दिवसांत जास्त उत्पन्न देणारे कांद्याचे नवीन वाण विकसित करण्यात आले आहे. नाशिकच्या राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन केंद्राने यावर संशोधन केले आहे. मागील १० वर्षांपासून कांद्याच्या नवीन वाणावर संशोधन सुरू होते. कांद्याच्या नवीन वाणाचे कोणत्याही राज्यात उत्पादन घेता येणार आहे. केंद्र सरकारकडून या वाणाला मान्यता दिली असून लवकरच त्यास नाव देण्यासाठी वरिष्ठ पातळीवर विशेष बैठक होणार असल्याची माहिती संशोधकांकडून देण्यात आली.

या नवीन वाणातून उत्पादन हेक्टरी ३०० ते ३५० क्विंटलपर्यंत येत असल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. नाशिक येथील या केंद्रातर्फे १९८७ साली ‘ॲग्रो फाउंड डार्क रेड’ हे वाण विकसित केले होते. त्यानंतर संशोधन केंद्रातील खरिपासाठी हे दुसरे वाण विकसीत केले आहे.

नाशिक येथील केंद्राचे प्रकल्प प्रमुख डॉ. मनोजकुमार पांडे, केंद्रप्रमुख डॉ. सुजय पांडे, सिन्नर केंद्राचे सचिन चौधरी, डॉ. नितीश शर्मा, डॉ. जस्ती श्रीवर्षा यांनी यावर संशोधन करत मेहनत घेतली आहे. या वाणाची विक्री १५ मे ते १५ जून कालावधीत सिन्नर, निफाड तालुक्यातील चितेगाव व कुंदेवाडी येथे सुरू होणार आहे. अशी माहिती नाशिक केंद्राकडून देण्यात आली.

राष्ट्रीय फलोत्पादन संशोधन केंद्राचे प्रमुख मनोजकुमार पांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "पावसामुळे उत्पादनात घटते यामुळे शेतकरी खरिप हंगामात कांदा लागवड करताना विचार करतो. मात्र, नवीन वाण याला छेद देणारे आहे. देशभराचा विचार केल्यास नाशिकचा उन्हाळ कांदा बाजारात येण्यापूर्वी उपलब्धतेत मोठी तफावत आहे. ही तफावत दूर करण्याबरोबरच खरिपातील कांद्याचे उत्पादन वाढवण्याचा उद्देश समोर ठेवून यावर काम केले आहे. त्यात आम्हाला यश आले आहे. शिवाय हे वाण महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेशसह अन्य राज्यात उत्पादन घेण्यास अनुकूल असेल", अशी माहिती पांडे यांनी दिली.

नवीन वाणाचे वैशिष्ट्य

नवीन कांद्याच्या वाणाचा रंग हलका लाल आहे. याचा उत्पन्न कालावधी ८० दिवसांचा आहे. नवीन विकसित वाणाचे तात्पुरते नाव लाईन ८८३ असे असून पुढच्या ४ महिन्यात शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहे. याचे हेक्टरी ३५० क्विंटल असे उत्पादन निघू शकेल असा अंदाज संशोधकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Diwali Article: माळरानावर रुजविले हिरवाईचे स्वप्न...

Stubble Burning: शेतकऱ्यांना दिलं आर्थिक पाठबळ; पंजाबमध्ये पीक अवशेष जाळण्याच्या घटनांत ८० टक्क्यांनी घट

Sugarcane Harvesting: ऊस तोडणीसाठी योग्य वेळापत्रकाची गरज

Agrowon Diwali Article: शेतीनं तारलंच नव्हे, तर उभं केलं...

GM Foods: देशात जीएम खाद्यपदार्थ आयात, विक्रीवर बंदी! हायकोर्टाचा 'हा' निर्णय शेतकऱ्यांसाठी का आहे महत्त्वाचा?

SCROLL FOR NEXT