Banana Crop  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Market : केळी दांड्याचे १ किलो वजन धरण्याकडे दुर्लक्ष

Banana Rate : कापूस, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहे, असाच संताप, नाराजी केळी उत्पादकांतही आहे. केळीची आवक अल्प किंवा कमी असतानाही खानदेशात केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी केली जात आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : कापूस, सोयाबीन, ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांना हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी संतप्त आहे, असाच संताप, नाराजी केळी उत्पादकांतही आहे. केळीची आवक अल्प किंवा कमी असतानाही खानदेशात केळीची जाहीर दरांपेक्षा कमी दरात खरेदी केली जात आहे. तसेच केळी घडाच्या दांड्याचे वजन एक किलो गृहीत धरण्याची मागणीही दुर्लक्षित आहे.

प्रशासन, शासन निवडणुकीत व्यग्र आहे. बाजार समित्या सुस्त आहेत. व्यापाऱ्यांच्या तालावर बाजार समित्यांचे कामकाज सुरू असल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. केळीची सर्वाधिक लागवड असलेल्या जळगावातील रावेर, यावल, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा या बाजार समित्या केळी उत्पादकांच्या मागण्यांवर मूग गिळून गप्प आहेत, असा आरोप केळी उत्पादक करीत आहेत.

वजन एक किलो करा

केळीची खरेदी करताना खरेदीदार घडाच्या दांड्यातून फण्या वेगळ्या करून घेतात. फण्या बॉक्स, क्रेटमध्ये पॅकिंग करून त्यांची वाहतूक केली जाते. केळीचे वजन करताना या दांड्याचे वजन सध्या फक्त ७०० ग्रॅम गृहीत धरले जाते. हे वजन एक किलो गृहीत धरून त्यानुसार शेतकऱ्यांना पैसे किंवा चुकारे दिले जावेत, अशी मागणी अनेक वर्षे आहे. पण त्यावर जिल्हा प्रशासन, निबंधक कार्यालय, बाजार समित्या, खरेदीदार आदी लक्ष देत नसल्याचा आरोप केळी उत्पादक करीत आहेत.

यातच खानदेशात केळीची आवक कमी आहे. तरीदेखील केळीचे दर खरेदीदार पाडत आहेत. तसेच जे दर जळगावातील रावेर, चोपडा आदी बाजार समित्या जाहीर करतात, त्या दरांनुसार केळीची खरेदी केली जात नसल्याची स्थिती खानदेशात असून, याबाबत तातडीने प्रशासनाने कारवाईसत्र राबविण्याची मागणीही आहे.

या आहेत अन्य मागण्या

खरेदीदारांना परवाना आवश्यक असावा व त्यांची अनामत रक्कम बाजार समित्यांनी घ्यावी

केळीची खानदेशात थेट किंवा शिवार खरेदी केली जात असल्याने या खरेदीसंबंधी निरीक्षण, नियमन यासाठी पथकांची नेमणूक करावी

थेट शिवार केळी खरेदीवर खरेदीदारांकडून शुल्क आकारणी बंद करावी

केळीचे जे दर जाहीर होतात, त्याच दरात खरेदी झालेली नसल्यास संबंधित खरेदीदार, एजंट व व्यापारी यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Crop Damage : पाण्याचा लोंढा पीक नाही, जमीनच घेऊन गेला..!

Navratri Festival : नवरात्रोत्सवानिमित्त बाजारपेठ फुलली

Rain Alert Maharashtra : राज्यात विजांसह वादळी पावसाचा इशारा कायम

Crop Damage Compensation : एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही ः झिरवाळ

Mosambi Crop Management : काटेकोर व्यवस्थापनातून मिळेल मोसंबी, संत्र्याचे दर्जेदार उत्पादन

SCROLL FOR NEXT