Shetkari Sangh Election agrowon
ॲग्रो विशेष

Shetkari Sangh Election : शेतकरी संघाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर उपाध्यक्ष भाजपकडे, पुन्हा मंत्री मुश्रीफांचा वरचष्मा

Hasan Mushrif : पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षांची पाकीट बंद नावे युवराज पाटील यांच्याकडे दिली होती.

sandeep Shirguppe

Kolhapur Shetkari Sangh : शेतकरी सहकारी संघाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या प्रवीणसिंह पाटील यांची, तर उपाध्यक्षपदी भाजपच्या राजसिंह शेळके यांची निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांनी अध्यक्ष-उपाध्यक्षांची पाकीट बंद नावे युवराज पाटील यांच्याकडे दिली होती. त्यानुसार पाटील यांनी शासकीय विश्रामगृहात निवडीची माहिती दिली.

त्यानंतर शेतकरी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयात जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी मिलिंद ओतारी यांच्या उपस्थितीत ही निवड झाली.

शेतकरी संघाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद कोणाला द्यावे, यासाठी काल शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील, आमदार विनय कोरे यांची बैठक झाली.

यामध्ये पहिली संधी राष्ट्रवादी आणि भाजपला देण्यात आली. अध्यक्षपद राष्ट्रवादीला, तर उपाध्यक्षपद भाजपला देण्याचा निर्णय झाला. त्यानुसार सर्व नेत्यांनी संघाचे माजी अध्यक्ष युवराज पाटील यांच्याकडे पाकीट बंद नाव दिले. पाटील यांनी साडेदहा वाजता शासकीय विश्रामगृहात सर्व संचालक मंडळाची बैठक घेऊन अध्यक्ष-उपाध्यक्षांची नावे जाहीर केली.

शेतकरी संघाच्या भवानी मंडप येथील मुख्य कार्यालयात इच्छुकांनी अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केले. प्रवीणसिंह पाटील यांना जी. डी. पाटील यांनी सूचक व अमरसिंह पाटील यांनी अनुमोदन दिले.

उपाध्यक्षपदासाठी राजसिंह शेळके यांचे नाव संचालक दत्तात्रय राणे यांनी सुचवले, उपनिबंधक करे यांनी पाटील आणि शेळके यांची बिनविरोध निवड झाल्याच्या घोषणेनंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देत जल्लोष केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Model Village: या गावाला शाब्बासकी हवीच!

Election Commission : ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

Panchayati Raj : स्वातंत्र्यानंतर पंचायती राज व्यवस्थेचा विकास

Seed Bill 2025 : कृषी मंत्रालयाने नवीन बियाणे विधेयकाचा मसुदा केला जारी; ११ डिसेंबरपर्यंत सूचना पाठवता येणार

Bihar Election Results 2025: बिहारमध्ये 'एनडीए' द्विशतकाच्या दिशेने, सर्वात मोठा पक्ष कोणता?; RJD ला धक्का

SCROLL FOR NEXT