Ahilyanagar News: दैठणे गुंजाळ (ता. पारनेर) व हिवरेबाजारसह (ता. अहिल्यानगर) आसपासच्या गावांत अज्ञात आजाराने गोठ्यातील दुभत्या व अन्य संकरित गाई दगावण्याचे प्रकार सुरूच आहेत. .आतापर्यंत या भागात ३० गाई दगावल्या आहेत. तर, १४ गाई बाधित आहेत. रक्त, अवयव व चाऱ्याचे नमुने नेऊन चार दिवसांचा कालावधी उलटला तरी अजून त्याबाबतचा अहवाल मिळाला नाही. गाई दगावण्याचे प्रकार थांबत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत..Livestock Exhibition: कसगीच्या पशुप्रदर्शनात ‘लाखमोला’ची जनावरे.या प्रकरणी पशुसंवर्धन विभागाने सुरुवातीला तपासणीसाठी नमुने पाठवून नियमित तपासणी करत यामागील कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्यातून कारण कळाले नसल्याने पुन्हा मंगळवारी (ता. २४) सायंकाळी पुणे येथील पशुरोग निदान केंद्राच्या पथकाने दैठणे गुंजाळ, हिवरेबाजार व परिसरात भेट देऊन मृत गाईंच्या शवविच्छेदनातून अवयवाचे, बाधित पशुधनाच्या रक्ताचे तसेच चारा, पशुखाद्याचे मिळून जवळपास ४० पेक्षा अधिक नमुने तपासणीसाठी नेले. चार दिवसांपेक्षा अधिक काळ उलटूनही त्याबाबत अहवाल आला नाही..दरम्यान, गाईच्या दगावण्याचे प्रकार मात्र थांबायला तयार नाहीत. आतापर्यंत मृत गाईंची संख्या ३० झाली असून, त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना वीस लाखांपेक्षा अधिकचा आर्थिक फटका बसला आहे..हे मृत्यू कशामुळे होत आहेत, हे कळत नसल्याने व तपासणी अहवालही येत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. सध्या या भागात सुमारे १४ जनावरे बाधित असून त्यावर उपचार सुरू आहेत. तर, चारही जनावरे बरी झाल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगितले जात आहे. .Livestock Development: भ्रूण प्रत्यारोपणातून देशी गोवंश संवर्धन.या जनावरांना चाराही वेगवेगळ्या भागांतील असल्याने अज्ञात आजार कळत नसल्याने पशुसंवर्धन विभागही हतबल झाला आहे. तपासणीसाठी नेलेल्या नमुन्याचा अहवाल आल्याशिवाय नेमके कारण कळणार नाही असे पशुतज्ज्ञ सांगत आहेत..आमच्याकडे पाच गाई होत्या, त्यापैकी चार गाई दगावल्या असून, एक गाय बाधित आहे. ती देखील जगेल की नाही हे सांगता येत नाही. आमचा गोठा पूर्ण रिकामा झाला आहे. दररोज ७० लिटर दुधाचे संकलन व्हायचे. अनेक वर्षांचा व्यवसाय संपला आहे. शेतकऱ्यांना उभे राहण्यासाठी सरकारने मदतीचा हात दिला पाहिजे.दत्तात्रय ठाणगे, पशुपालक शेतकरी, दैठणे गुंजाळ, ता. पारनेर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.