NCP Pune Agrowon
ॲग्रो विशेष

NCP Crisis : ‘राष्ट्रवादी’ शरद पवार गटाच्या जिल्हाध्यक्षपदी जगन्नाथ शेवाळे

Swapnil Shinde

Pune News : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे माजी आमदार जगन्नाथ शेवाळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी नुकतीच निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशाने शेवाळे यांची नियुक्ती केली आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, माजी नगरसेवक काकासाहेब चव्हाण तसेच जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या निवडीवेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर हे अजित पवार गटात दाखल झाल्याने शेवाळे यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे. शेवाळे हे शरद पवार यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू सहकारी म्हणून पुणे जिल्ह्यात परिचित आहेत. विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

‘‘शरद पवार यांनी पुन्हा माझ्यावर पुन्हा विश्वास टाकून जिल्हाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी दिली आहे. पदाचा उपयोग सर्व सामान्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासह पक्षाच्या विचारसरणीला समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोचविण्यासाठी करीन. तसेच पक्षाला बळकट करून जिल्ह्यात ‘राष्ट्रवादी’चा विस्तार करणार आहे, असे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Business : दूध व्यवसायातून सामान्य शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद ः बाळासाहेब थोरात

Livestock Census : यंदा पशुधनाची गणना मोबाइलद्वारे होणार

Solar City : शिर्डी चार महिन्यांत शंभर टक्के सौरशहर होणार

FMD Vaccination : सांगली जिल्ह्यातील ४० हजार जनावरांना लाळ्या खुरकूतची लस

Farmers Death : अमरावती जिल्ह्यात वर्षभरात १४४ शेतकऱ्यांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT