Maharashtra Rain Prediction: राज्यात पाऊस ओसरला असताना, उन्हाचा चटका वाढू लागला आहे. यातच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह पावसाला पोषक हवामान आहे. आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्रात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे..नैॡत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) बुधवारी (ता. २३) राजधानी दिल्लीसह राजस्थान, पंजाब, हरियानाच्या बहुतांश, तर गुजरात, उत्तर प्रदेशच्या काही भागांतून माघार घेतली असून, सोमवारी (ता. २८) मॉन्सूनच्या परतीची सीमा कायम होती. पूर्व-मध्य अरबी समुद्रामध्ये १.५ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तर उत्तर कर्नाटकपासून तमिळनाडूपर्यंत समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे..Maharashtra Weather Update: पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांसह, वादळी पाऊस शक्य.पावसाने उघडीप देताच, राज्यात दुपारच्या वेळी उन्हाचा चटका वाढू लागला आहे. सोमवारी (ता. २८) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये सोलापूर येथे राज्यातील उच्चांकी ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १५.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले..सोमवारी (ता. २८) पहाटे किमान तापमानात घट झाल्याने काहीसा गारठा वाढल्याचे, तसेच अनेक ठिकाणी दाट धुके आणि दव पडल्याचे दिसून आले. धुळे येथील कृषी महाविद्यालयात १६.५ तर परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात १६ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. आज (ता. २९) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाची शक्यता आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, तसेच मध्य महाराष्ट्रातील नाशिक घाटमाथा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यात वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) देण्यात आला आहे..Maharashtra Rain: घाटमाथा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता.बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचे क्षेत्रम्यानमारच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात सोमवारी (ता. २८) तीव्र कमी दाबाचे क्षेत्र (डिप्रेशन) तयार झाले आहे. अंदमान बेटांवरील माया बंदरापासून ५९० किलोमीटर ईशान्येकडे असलेली ही प्रणाली म्यानमार आणि बांगलादेशच्या किनाऱ्याकडे जाण्याची शक्यता आहे..विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :रायगड, रत्नागिरी, नाशिक घाटमाथा, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर.सरासरी तापमान (अंश से.)विभाग किमान कमालउत्तर महाराष्ट्र १६.५ ३४.८पश्चिम महाराष्ट्र १५.६ ३६.६कोकण २२.८ ३४.७मराठवाडा १६ ३५.८विदर्भ २० ३६.उन्हाचा चटका अधिक असलेली ठिकाणे (तापमान अंश सेल्सिअसमध्ये)सोलापूर ३६.६, अमरावती ३६, छत्रपती संभाजीनगर ३५.८, अकोला ३५.४..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.