Turmeric and Orange Crop Management Agrowon
ॲग्रो विशेष

Orange Crop Management : नैसर्गिक पद्धतीने हळद, संत्रा पीक नियोजन कार्यशाळा

KVK Washim : कृषी विज्ञान केंद्रातंर्गत उद्यानविद्या विभागाच्या वतीने हळद व संत्रा पीक नियोजन कार्यशाळा घेण्यात आली.

Team Agrowon

Washim News : या वर्षी प्रायोगिक तत्त्वावर नैसर्गिक पद्धतीने गोकृपा अमृत आधारित हळद व संत्रा पिकाचे प्रात्यक्षिक निवडक शेतकऱ्यांच्या शेतावर घेण्यात आले होते. या दोन्ही पिकाच्या उत्पादनात अपेक्षित वाढ दिसून आली व उत्पादन खर्च कमी होऊन जमिनीची व उत्पादित मालाची प्रतसुद्धा वाढलेली दिसून आली. या अनुषंगाने कृषी विज्ञान केंद्रातंर्गत उद्यानविद्या विभागाच्या वतीने हळद व संत्रा पीक नियोजन कार्यशाळा घेण्यात आली.

हळद, संत्रा पिकांमध्ये येत्या खरीप हंगामात नियोजन बद्ध अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने उद्यानविद्या तज्ञ निवृत्ती पाटील यांच्या पुढाकाराने नुकतेच अहमदाबाद येथे दोन दिवसीय प्रशिक्षण व अभ्यासदौरा झाला. याचाच पुढील भाग म्हणून केव्हीकेच्या प्रक्षेत्रावर गोकृपा अमृत आधारित नैसर्गिक पद्धतीने हळद व संत्रा पीक नियोजन या विषयावर कार्यशाळा झाली.

कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. आर. एल. काळे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निवृत्ती पाटील होते. कार्यशाळेस रिसोड, मालेगाव व मानोरा तालुक्यांतील बहुसंख्य हळद व संत्रा उत्पादक सहभागी झाले.

तांत्रिक सत्रात पाटील यांनी हळद व संत्रा पिकाचे सेंद्रिय पद्धतीने अन्नद्रव्य व्यवस्थापन, प्रमुख किड व रोगांची ओळख, प्रादुर्भाव होण्याचा मुख्य कालावधी व त्यांचे जैविक नियंत्रण आदी विषयांवर सविस्तर माहिती दिली. आगामी खरीप हंगामात गोकृपा अमृतने कंपोस्ट खत निर्मिती व गोकृपा अमृत बनविण्याच्या पद्धतीबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

विलासराव बोरकर (वडजी), गणेश गव्हाणे (कोयाळी), गोविंद देशमुख (करडा) या शेतकऱ्यांनी मागील हंगामात हळद व संत्रा पिकात या पद्धतीचा अवलंब केला असून आपले अनुभव मांडले. डॉ. काळे यांनी नैसर्गिक शेती ही काळाची गरज असून जमिनीचे आरोग्य राखून निरोगी आणि किड व रोगस प्रतिकारक्षम पीक उत्पादित करण्याचे आवाहन केले.

तांत्रिक सत्रानंतर करडा येथील गोविंद देशमुख यांच्या शेतात सेंद्रिय हळद व इतर पिकांची तसेच कंपोस्ट खत निर्मिती व गोकृपा अमृत कल्चर निर्मितीयुनिटची शेतकऱ्यांनी पाहणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Seed Law: स्वतंत्र बियाणे कायदा करणार: कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

Gold Market: गुंतवणुकीसाठी सोने खरेदीकडे कल

Transparency in Quality Control: ‘गुणनियंत्रणा’साठी ई-लॅब, ई-इन्स्पेक्टर

Maharashtra Heatwave: उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता

Sugarcane FRP: साखर कारखान्यांकडे ३,५०० कोटींची एफआरपी थकीत, राजू शेट्टींची माहिती, साखर आयुक्तांची घेतली भेट

SCROLL FOR NEXT