Cooperative Society  Agrowon
ॲग्रो विशेष

Credit Society : पतसंस्थांचे डिसेंबरमध्ये राष्ट्रीय महाअधिवेशन

Cooperative sector : या निमित्ताने पतसंस्थांचे शक्तिप्रदर्शन करून दबावगट करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

राजेश कळंबटे

Ratnagiri News : देशभरातील पतसंस्थांचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. सर्व पतसंस्थांना ठेव विम्याचा लाभ मिळावा, सिबिलसारखी प्रणाली वापरण्यास मिळावी, जेणेकरून कर्जवसुली जास्त प्रमाणात होईल, अशा अनेक समस्या मांडण्यासाठी सहकार भारतीने पतसंस्थांचे राष्ट्रीय महाअधिवेशन नवी दिल्ली येथे डिसेंबरमध्ये आयोजित केले आहे. या निमित्ताने पतसंस्थांचे शक्तिप्रदर्शन करून दबावगट करण्यात येणार आहे, अशी माहिती सहकार भारतीचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. उदय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेत गुरुवारी (ता. २) आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. जोशी म्हणाले, की विना संस्कार, नाही सहकार हे घोषवाक्य असलेली सहकार भारती गेली अनेक वर्षे देशभरात काम करत आहे. २८ प्रदेश आणि ६५० पेक्षा अधिक जिल्हा केंद्रांपर्यंत सहकार भारतीचे काम सुरू आहे.

पुण्यात सायबर सिक्युरिटी, नवी मुंबईत मत्स्य व्यवसायासंबंधी आणि आता दिल्लीमध्ये सहकारी पतसंस्थांच्या परिषदेचे आयोजन केले आहे. यात देशभरातील १० हजार प्रतिनिधी सहभागी होतील. भारतात साडेआठ लाख सहकारी पतसंस्था आहेत. या संस्थांनी ७० हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले आहे. २४५ कोटी रुपयांचा स्वनिधी आहे. कोट्यवधी रुपयांच्या ठेवी जमा आहेत. आजही सहा लाख खेड्यांत बॅंका, पतसंस्था पोहोचलेल्या नाहीत.

अशा दृष्टीने तळागाळात पोहोचण्यासाठी पतसंस्थांची भूमिका महत्त्वाची आहे. तरीही सरकार दरबारी पतसंस्थांचे अनेक प्रश्न समस्या प्रलंबित आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशात सर्वाधिक पतसंस्था आहेत.

महाअधिवेशनाच्या उद्‍घाटनावेळी केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा व वित्त क्षेत्रातील सर्वांसमोर पतसंस्थांच्या मागण्या मांडण्यात येणार आहेत, असे जोशी यांनी सांगितले. सहकार भारतीच्या माध्यमातून होणाऱ्या परिषदेला रत्नागिरी जिल्ह्यातून १०० प्रतिनिधी दिल्लीला जाणार असल्याची माहिती अॅड. दीपक पटवर्धन यांनी या वेळी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT