Silk Farming Project Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Farming Project : नाशिक जिल्हा परिषद राबविणार रेशीम शेती प्रकल्प

Nashik Zilha Parishad : शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती हा महत्त्वाचा उद्योग असू शकतो. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत रेशीम शेती प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

Team Agrowon

Nashik News : शेतकऱ्यांसाठी पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती हा महत्त्वाचा उद्योग असू शकतो. त्यामुळे अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत रेशीम शेती प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे.

यासाठी तालुकास्तरावर क्लस्टर विकसित केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

रेशीम शेतीचे उत्पादन घेऊन उत्पादित माल जालन्याला पाठविण्यासाठी जिल्हा परिषदेकडून अभ्यास सुरू आहे. रेशीम शेतीचे जालन्यात मोठे मार्केट आहे. रेशीम शेती प्रकल्पातून शेतकऱ्याला मासिक ५० हजारांचे उत्पन्न मिळू शकते.

रेशीम व्यवसाय अत्यंत कमी खर्चामध्ये म्हणजे शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून उभा करता येतो. रेशीम शेती प्रकल्प जिल्हास्तरावर राबविण्यासाठी १५ तालुक्यांतून विविध ठिकाणी उद्योग कार्यशाळा सुरू आहेत.

देशात रेशीम उत्पादन मोठ्या प्रमाणात होत असले तरी ६ ते ७ हजार टन रेशीम धागा इतर देशातून आयात केला जातो. त्यावर प्रक्रिया करून पुन्हा दर्जेदार रेशमी वस्त्रे जवळजवळ शंभर देशांना निर्यात केली जातात.

२०१४-१५ मध्ये देशातून २८२९.८७ कोटींची वस्त्रे निर्यात करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने नैसर्गिक रेशम धागे, वस्त्रे, रेडिमेड गारमेंट्स, सिल्क कार्पेट्स आणि रेशीम वेस्टचा समावेश होतो. यासाठी रेशीम उद्योगाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

रेशीम प्रकल्प प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन मित्तल यांनी केले. ज्यांच्याकडे जमीन आहे, त्यांच्यासाठी रेशीम प्रकल्प आणि ज्यांच्याकडे जमीन नाही त्यांच्यासाठी मशरूम प्रकल्प जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara Power Crisis : अघोषित भारनियमनाने सातारा जिल्ह्यातील शेती संकटात

Ahilyanagar Power Crisis : अहिल्यानगर जिल्ह्यात विस्कळीत वीजपुरवठ्यामुळे शेतकरी बेजार

Mahabeej Jan Sanwad : महाबीज जनसंवाद कार्यक्रमातून जनजागृती

Farmer Support: संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे : सावे

Chandwad Drought : चांदवडचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

SCROLL FOR NEXT