Farmer Sabha  Agrowon
ॲग्रो विशेष

नाशिक: पिंपळगाव बाजार समितीमध्ये लिलावावर ‘सीसीटिव्ही’ चे राहणार लक्षः सभापती बनकर

नाशिक: पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्यासह इतर शेतीमालाची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे.

टिम अॅग्रोवन

नाशिक: पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) कांद्यासह इतर शेतीमालाची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये अनेक वेळा वादही निर्माण झाले होते.

नाशिक: पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Agricultural Produce Market Committee) कांद्यासह इतर शेतीमालाची आवक ही दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये अनेक वेळा वादही निर्माण झाले होते. शेतकऱ्यांशी (farmer) मनमानी करणाऱ्या आडतदार व्यापाऱ्यांना लिलावात चाप बसावा व पारदर्शी व्यवहारासाठी बाजार समितीच्या आवारात सीसीटीव्ही कार्यान्वित करणार असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती आमदार (MLA) दिलीप बनकर यांनी दिली.

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची (Agricultural Produce Market Committee) १७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शनिवार (ता.२६) रोजी समितीच्या सभागृहात सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर बाजार समितीचे उपसभापती दीपक बोरस्ते, जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे, जिल्हा परिषद सदस्य सुरेश कमानकर, बाजार समितीचे संचालक सुरेश खोडे, सोहनलाल भंडारी, रामभाऊ माळोदे, नंदू सांगळे, संजय मोरे, निवृत्ती धनवटे, शंकरलाल ठक्कर, सचिव बाळासाहेब बाजारे आदींसह शेतकरी (Farm) व्यापारी, कामगार घटक उपस्थित होते.

बनकर म्हणाले, ‘‘गेल्या अनेक दिवसांपासून मागणी होत होती पण मध्यंतरी बाजार समिती आवारात असे गैरप्रकार समोर येऊ लागल्याने बाजार समितीच्या सर्वसाधारण सभेत हा सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची लवकरच अंमलबजावणी होणार आहे.’’

सचिव बाळासाहेब बाजारे यांनी २०२०-२१ वर्षातील अहवालाचे वाचन करत केले. त्यात उत्पन्न २० कोटी ६७ लाख २३ हजार झाले.खर्च १० कोटी ७० लाख ४९ हजार वजा जाता ९ कोटी ९६ लाख ७४ हजारांची वाढावा रक्कम मिळाल्याची माहिती दिली. सुरेश खोडे यांनी प्रास्ताविक केले. सोहनलाल भंडारी, नंदू सांगळे यांनी बाजार समितीच्या विकास कामांची माहिती देत आमदार बनकरांचे कौतुक केले. नारायण पोटे यांनी आभार मानले.

गतवर्षात ८ आडत्यांचे परवाने रद्द
व्यापाऱ्यांकडून (Merchant) शेतकऱ्यांची (Farmer) लूट होत असल्याचे निदर्शनास येताच बाजार समितीने ८ आडत व्यापाऱ्यांचे वर्षभरासाठी परवाने रद्द केले आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांना आता वर्षभर शेतीमाल खरेदी करता येणार नाही. कोरोनासारखी महामारी असताना पिंपळगाव बाजार समितीने शेतकरी कामगार घटकांसाठी सोयीसुविधा पुरवल्या,भरघोस मदतनिधी उपलब्ध करून दिला.बाजार समितीबाबतीत शेतकरीकामगार (Farmer Worker) यांच्या अडीअडचणी,तक्रारी असतील तर त्या सोडविण्यासाठी बाजार (Bajar-Market) समिती कटिबद्ध असल्याचे बनकर यांनी सांगितले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT