Nashik News : जिल्ह्यातील नद्या, नैसर्गिक जलस्रोत आणि जलाशयांचे प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केल्या. जिल्ह्यात १५ ते ३० एप्रिल या काळात राबविल्या जाणाऱ्या जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याचे सूक्ष्म नियोजन करून प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असेही त्यांनी सांगितले.
जलसंपदामंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (ता. १४) ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ पूर्वतयारीबाबत दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यानंतर आयोजित बैठकीप्रसंगी जिल्हाधिकारी शर्मा बोलत होते.
या वेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, त्र्यंबकेश्वर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी श्रिया देवचक्के आदी उपस्थित होते.
पाणीगळती रोखा
जलव्यवस्थापन कृती पंधरवड्यात धरण परिसराचे संवर्धन, कालवा, पाटचारीची स्वच्छता करून कालवे प्रवाहित करावेत. कालव्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्यात यावे.
तसेच जलसंपदा विभागाच्या मालमत्तांची माहिती अद्ययावत करतानाच त्यासाठी भूमी अभिलेख विभागाची मदत घेण्याची सूचना जलज शर्मा यांनी केली. पंधरवड्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना पाणीगळती रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असेही निर्देश शर्मा यांनी दिले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.