Uddhav Thackeray Speech: सहा खासदारांच्या फुटीनंतर शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची शनिवारी (दि.२७) यवतमाळमध्ये पहिली सभा झाली. या सभेवेळी उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना ठाकरे यांनी, माझी चूक झाल्याचे सांगत जनतेची माफी मागितली. ठाकरे शिवसेनेच्या सहा फुटीर खासदारांमध्ये वाशिम- यवतमाळचे खासदार संजय देशमुख यांचा समावेश आहे. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आज उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या यवतमाळ मतदारसंघात सभा घेतली. यावेळी त्यांनी फुटीर खासदार आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला..माझ्या कडवट शिवसैनिकांना भेटण्यासाठी आणि शिवसेनाप्रमुखांचा चेहरा बघून, मशाल चिन्ह बघून ज्यांनी मतदान केलं; त्या मतदारांना धन्यवाद देण्यासाठी मी यवतमाळ दौऱ्यावर आलो असल्याचे ठाकरे यांनी सांगितले..आपण पावसाळ्याची वाट बघत असतो. एकदा का पाऊस पडला की नवीन कोंब फुटतात. तसा हा माझा पावसाळा आहे. सगळ्या कार्यकर्त्यांचे प्रेम हा माझा पावसाळा आहे. अनेक सडलेली पाने गेली, तरीही पाऊस पडून नवीन कोंब उगवतात. ते नवीन कोंब उगवणारे तुम्ही कट्टर निष्ठावान शिवसेना प्रमुखांचे जीवाला जीव देणारे शिवसैनिक आहात, असे त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले..Uddhav Thackeray: शिवसैनिक खचला नाही, पेटून उठलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल.मी जे तुम्हाला बुजगावणे दिले होते. त्याला अक्षरक्ष: रक्ताचे पाणी करुन, कशाची तमा न बाळगता निवडून दिले. त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो. तसेच वाशिम- यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील मतदारांची माफी मागतो. तुम्ही केवळ शिवसेना प्रमुखांचा चेहरा आणि माझा शब्द या भरवशावर या गद्दाराला निवडून दिले होते. पण त्यांनी गद्दारी करुन आपल्या विश्वासाला काळे फासले. याचा त्यांना जाब विचारा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले..Amit Shah Statement On Eknath Shinde: शिवसेना शिंदेंचीच, आता गट राहिलेला नाही, अमित शहांचा ठाकरेंवर निशाणा.शेवटी गद्दार हा गद्दारांच्या कळपात गेला. मिंधेंनी ४० आमदार फोडले. जेव्हा विदर्भात बैलपोळा होता. तेव्हा त्या बैलावर लिहिले होते की ५० खोके एकदम ओके. तेव्हा आमदारांचा भाव ५० खोके असेल तर खासदाराचा किती असेल?. म्हणजे हा एक धंदा झाला आहे. निवडून यायचं आणि आपला हमीभाव वाढवायचा आणि सगळं काही विकून टाकायचे, अशा शब्दांत त्यांनी फुटीरांचा समाचार घेतला. .ठाकरेंनी भर सभेत संजय देशमुखांचा व्हिडिओ दाखवलायावेळी ठाकरेंनी भर सभेत खासदार संजय देशमुखांचा एक व्हिडिओ दाखवला. ज्यात देशमुख आईची शपथ घेत ठाकरे यांच्यासोबत राहीन, असे सांगत असल्याचे दिसते. आईची शपथ घेऊन हे गद्दारी करणार असतील तर आईला काय वाटत असेल?. चूक आपल्या सगळ्यांची, विशेषतः माझी झाली. त्यांनी पक्ष चोरला, चिन्ह चोरले. तरीही ठाकरे उभा आहे. आमदार फोडल्यानंतर शिवसेना संपली होती तर तुमच्या विरोधात नाकावर टिच्चून जनतेने ९ खासदार मशाल चिन्हावर निवडून आणले होते. ते फोडण्याची वेळ का आली?, असा सवाल त्यांनी केला. .एक माल ५० कोटींना विकला, संजय राऊतांचा फुटीर खासदारांवर निशाणा यावेळी खासदार संजय राऊत यांनीही जोरदार टीकास्त्र सोडले. ''कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ही सभा सुरु आहे. येथे शेतकऱ्यांचा शेतमाल येतो. विकला जातो. त्याला फार काय भाव मिळत नाही. पण पंधरा दिवसांपूर्वी एक माल आला आणि ५० कोटींना विकला गेला. तो म्हणजे तुमचा खासदार. खासदार गेले आणि आता आपण त्यांच्या दुखवट्याला आलो आहोत. दहावे, बारावे करु आणि पुढच्या कामाला मोकळे होऊ,'' अशा शब्दांत राऊत यांनी खासदार संजय देशमुख यांच्यावर निशाणा साधला. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.