Local Body Elections Agrowon
ॲग्रो विशेष

Local Body Election : नाशिक जिल्ह्यातील गट-गणांची १८ ला अंतिम प्रसिद्धी

ZP Election : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप गट-गणांवर दाखल ६४ हरकतींवर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सुनावणी झाली.

Team Agrowon

Nashik News : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या प्रारूप गट-गणांवर दाखल ६४ हरकतींवर विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्याकडे सुनावणी झाली. या वेळी जिल्ह्यातील काही गट-गणातील गावांचा चुकीच्या पद्धतीने सहभाग मान्य करताना त्यात दुरुस्ती करावी, असे आदेश गेडाम यांनी प्रशासनाला दिले. सर्वाधिक १९ हरकती निफाड तालुक्यातून दाखल होत्या. दरम्यान, १८ ऑगस्टला जिल्हाधिकारी हे अंतिम गट-गण प्रसिद्ध करतील.\

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी वेगाने सुरू आहे. दिवाळीनंतर निवडणुकांचे फटाके वाजणार असून, पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांसाठी मतदान पार पडेल,असा अंदाज आहे. तत्पूर्वी, महसूल प्रशासनातर्फे जिल्हा पातळीवर गट-गणांचे प्रारूप आराखडे तयार करण्यात आले. या प्रारूप आराखड्यावर जिल्ह्यातून ६४ हरकती व सूचना दाखल होत्या.

जिल्ह्यातून दाखल बहुतांश हरकतींमध्ये एका गट-गणातील गावाचा दुसऱ्या ठिकाणी समावेश केल्याबद्दल हरकत घेण्यात आली होती. तसेच, काही ठिकाणी गट-गणाची रचना करताना नदी,रस्ते तसेच मुख्य इमारतींचा विचार केला नसल्याच्या तक्रारी होत्या.

त्यानुसार आयुक्त डॉ. गेडाम यांनी हरकत घेणाऱ्या व्यक्तींची बाजू ऐकून घेतली. तसेच, ज्या ठिकाणी तक्रारीत तथ्य आहे, अशा गट-गणात तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

हरकत घेतलेल्या दोन व्यक्ती सुनावणीवेळी गैरहजर असल्याने या हरकती फेटाळण्यात आल्याचे समजते. दरम्यान, तालुकास्तरावर दुरुस्ती केल्यावर तहसीलदार हे गट-गणाचे आराखडे अंतिम स्वाक्षरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणार आहेत.

तसेच, जिल्हाधिकारी आराखड्यावर स्वाक्षरी करून सोमवारी (ता. १८) प्रसिद्ध करतील. सुनावणीवेळी नाशिक विभागाच्या उपायुक्त प्रज्ञा बढे, उपजिल्हाधिकारी (मदत व पुनर्वसन, ग्रामपंचायत) शुभांगी भारदे, तसेच जिल्ह्यातील सर्व प्रांतअधिकारी व तहसीलदार उपस्थित होते.

अशी होती हरकतींची संख्या

जिल्ह्यात निफाड तालुक्यातून गट-गणावर सर्वाधिक १९ हरकती दाखल होत्या. नाशिक व मालेगाव तालुक्यांतून प्रत्येकी १३ हरकती आल्या होत्या. या व्यतिरिक्त चांदवड (५), देवळा (३), नांदगाव (३), सिन्नर (२), सुरगाणा (२), कळवण (१), पेठ (१), येवला (१), तसेच त्र्यंबकेश्वरमधून (१) दाखल हरकतींवर सुनावणी घेण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Livestock Treatment Services: जनावरांचे दवाखाने दोन सत्रांत उघडणार

PM Kisan Scheme: पीएम किसान योजनेचे अडीच लाख लाभार्थी

Satara Agriculture Exhibition: ‘कृषी’च्या विभागीय प्रदर्शनात ३.२५ कोटींचे करार

Agriculture Sales Center: शेती उत्पादनासाठी वसईला विक्री केंद्र उभारणार

Unseasonal Rain Impact: अवकाळी पावसात कांदा पिकाची काळजी कशी घ्याल?

SCROLL FOR NEXT