Heavy Rain Agrowon
ॲग्रो विशेष

Heavy Rainfall: नाशिक जिल्ह्यात पावसामुळे कांदा, आंबा, डाळिंब, भाजीपाला पिकांचे नुकसान

Unseasonal Rain: नाशिक जिल्ह्यात शुक्रवार (ता.९) रोजी बागलाण, निफाड नांदगाव, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह इतर तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणावर पावसाने हजेरी लावली.

मुकूंद पिंगळे

Nashik News: नाशिक जिल्ह्यात शुक्रवार (ता.९) रोजी बागलाण, निफाड नांदगाव, नाशिक, दिंडोरी, इगतपुरी, त्र्यंबकेश्वरसह इतर तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणावर पावसाने हजेरी लावली. गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत वादळी वाऱ्यासह मॉन्सूनपूर्व पावसाने धुमाकूळ घातला आहे. उन्हाळ कांदा आंबा, डाळिंब, भाजीपाला पिकांसह साठविलेल्या चाऱ्याचे नुकसान वाढले आहे.

गेल्या पाच दिवसांत वादळी वाऱ्यासह होणाऱ्या मॉन्सूनपूर्व पावसाने उभी पिके, जनावरांचे गोठे, घरे, शाळा खोल्या आदींचे नुकसान मोठ्या प्रमाणावर आहे. नांदगाव तालुक्यात मनमाड महसूल मंडळात सर्वाधिक ७५ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती कृषी विभागांनी दिली. मात्र येथे अतिवृष्टी इतका पाऊस नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

नाशिक शहरातील नाशिक, पाथर्डी महसूल मंडळांत पावसाचा जोर होता. इगतपुरी तालुक्यातील इगतपुरी, घोटी तर निफाड तालुक्यांतील निफाड, चांदोरी परिसरांत पावसाने जोरदार हजेरी लावली. सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे, गोंदेसह परिसरांत पावसाचा जोर दिसून आला.

इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ व सुरगाणा तालुक्यात हलका पाऊस झाला. यात रब्बी उन्हाळ कांद्याचे लाखो रुपयांचे नुकसान झालेले आहे. बागलाण तालुक्यातील गोळवाड परिसरात विजेच्या धक्क्याने बैल शेतातून गावाकडे येत असताना विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे शेतकऱ्यांनी कळविले.

दृष्टिक्षेपात

देशवंडी येथे वीज पडून रघुनाथ वाळीबा डोमाडे यांची गाय मृत्युमुखी.

चिंचोली येथे सुगंधाबाई शांताराम सानप यांच्या तीन गायी मृत्यू

कुंभार्डे येथील विठ्ठल विष्णू वाघ यांच्या मेंढ्या वीज पडून दगावल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT