Narendra Modi Maharashtra agrowon
ॲग्रो विशेष

Narendra Modi Maharashtra : नरेंद्र मोदींचा धुळ्यातून प्रचार शुभारंभ, लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीवर टीका

Narendra Modi : काही लोक राजकारणात लोकांना लुटण्यासाठी येतात हे लोक महाविकास आघाडीत आहेत. अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार (ता.०८) धुळे येथे प्रचाराचा शुभारंभप्रसंगी केली.

sandeep Shirguppe

Maharashtra Politics : पुढच्या ५ वर्षात महाराष्ट्राला नव्या प्रगतीच्या उंचीवर ठेवण्यासाठी महायुतीचे सरकार येणे गरजेचे आहे. महाविकास आघाडीच्या गाडीला ब्रेक नाही चाके नाहीत हे काय राज्याचा विकास करणार. माझी लाडकी बहीण योजना महायुतीच्या सरकारने राबवली याची चर्चा महाराष्ट्रातच नाही तर याची देशात सुरू आहे. म्हणून महायुतीचं महाराष्ट्राला सक्षम पर्याय आहे. काही लोक राजकारणात लोकांना लुटण्यासाठी येतात हे लोक महाविकास आघाडीत आहेत. अशी टीका देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवार (ता.०८) धुळे येथे प्रचाराचा शुभारंभप्रसंगी केली.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "आमच्या सरकारने लोकांच्या कल्याणासाठी योजना राबवल्या परंतु महाविकास आघाडी सरकारने लोकांच्या योजनेच्या नावाखाली लुटण्याचे काम केले आहे. समृद्धा महामार्ग, मेट्रो सारख्या योजनांना खो घालण्याचा प्रयत्न केला. महायुतीच्या सरकारने मागील अडीच वर्षात वेगळा ठसा उमटवला आहे. शिंदेच्या सरकारने विकासाच्या वाटेवर पावले टाकल्याने अनेक कल्याणकारी योजना राबवल्या असल्याची माहिती मोदी यांनी दिली.

मोदी पुढे म्हणाले की, "महायुतीकडून नवीन वचननामा जाहीर करण्यात आला यातून विकासाची गती वाढणार आहे. शिदे, फडणवीस आणि पवार यांच्या नेतृत्वातील सरकारला आम्ही बळ देण्याचे काम करणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेचा मी आभारी आहे तुम्ही आम्हाला साथ दिली अजून विकास करण्यासाठी पुढे साथ द्यावी असे मोदी म्हणाले".

"राज्याचा मुख्य उद्देश आम्ही महिलांना प्रोत्साहन देण्याच्या योजना आणल्या आहेत महिलांची प्रगती झाली तर देशाची प्रगती होते म्हणून आम्ही मागच्या १० वर्षात महिलांना केंद्रस्थानी ठेवलं असल्याचे मोदींनी सांगितले".

नारी शक्ती अभियानाअंतर्गत महिलांना आरक्षण देण्याचे काम महायुतीकडून देण्यात आले आहे. मोफत गॅस योजने पासून ते शौचालय योजनेला आम्ही बळ आम्ही दिले आहे परंतु काँग्रेसने याची खिल्ली उडवली आहे.

नमो सन्मान योजना

महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पीएम किसानसोबत नमो शेतकरी सन्मान योजनेत ६ हजारांची मदत मिळत आहे. पीएम किसान आणि नमो सन्मान अंतर्गत वर्षाला १२ हजार मिळत आहेत जर महायुतीचे सरकार आल्यास ही रक्कम वाढवून १५ हजार करणार असल्याचा विश्वास पंतप्रधान मोदींनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Return : मॉन्सूनची महाराष्ट्राच्या बहुतांश भागातून माघार

Seasonal Paisewari: छत्रपती संभाजीनगर, जालन्याची हंगामी पैसेवारी ५० पैशांच्या आत

Beed Water Planning: बीडमध्ये पुढील दहा महिन्यांच्या पाणी, चाऱ्याचे नियोजन करा : जी. श्रीकांत

Rabi Crop Variety Selection: रब्बी पिकांसाठी वाण निवड महत्त्वाची

CJP Protest: जेलमध्ये टाकले, तरी आम्ही पुन्हा येऊ : दिपके

SCROLL FOR NEXT