Banana Cluster : जुन्नर, आंबेगावमध्ये केळी क्लस्टरची स्थापना

Deccan Valley Farmers Producer Company : जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथील डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून या तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी क्लस्टरची स्थापना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक नोव्हेंबर रोजी करण्यात आली.
Banana Cluster
Banana ClusterAgrowon
Published on
Updated on

Pune News : पुणे जिल्ह्यातील जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांत केळीच्या क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून वाढ होत आहे. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांची एकत्रित मूल्यसाखळी तयार करण्यासाठी जुन्नर तालुक्यातील काळवाडी येथील डेक्कन व्हॅली फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून या तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी केळी क्लस्टरची स्थापना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एक नोव्हेंबर रोजी करण्यात आली. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ, माहिती मिळण्यास मदत होणार आहे.

केळी पिकासाठी एकत्रित मूल्यसाखळी तयार करण्यासाठी या भागात ‘अॅग्रोवन’च्या माध्यमातून क्लस्टरची स्थापना करण्यासाठी विविध उपक्रम मागील काही वर्षांत हाती घेण्यात आले होते. त्याचा आधार घेऊन डेक्कन व्हॅली या कंपनीचे चेअरमन अजय बेल्हेकर यांनी क्लस्टर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी अभिनव कृषी फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे चेअरमन मंगेश भास्कर, शाश्वत फार्मिंग फाउंडेशनचे सदस्य शिवाजी कांबळे, सदस्य सुनील वामन, योगेश वाळुंज, शेतकरी प्रतिनिधी विनायक मुळे असे विविध शेतकरी सहकार्य करत आहे.

Banana Cluster
Fruit Crop Cluster : फळपिक क्‍लस्टरमधून होणार प्रक्रिया उद्योगांची उभारणी

शेतकऱ्याला स्वाभिमानाने आणि सन्मानाने स्वतःच्या पायावर उभा करणारा, समृद्धीच्या वाटेवर नेणारा आधुनिक जगाशी जोडणारा असा हा उपक्रम आहे. यामध्ये कृषी विभाग, आत्मा व नारायणगाव कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ तांत्रिक बाबींबाबत मार्गदर्शन करणार आहेत. दोन्ही तालुक्यांतील निर्यातक्षम एक हजार एकर क्षेत्र लागवडीखाली आणले जाणार आहे. त्यासाठी बाजार मागणीनुसार केळी पीक लागवडीचे वेळापत्रक तयार केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना शिवार फेरी, शेतीशाळा, प्रशिक्षण, अभ्यासदौरा व छापील साहित्य यांच्या माध्यमातून गुड अॅग्रिकल्चर प्रॅक्टिसेस बाबतीत सल्ला व मार्गदर्शन केले जाणार आहे. याशिवाय शेतकरी कंपनीच्या माध्यमातून योग्य प्रकारची निविष्ठा, उत्पादने, सेवा, वित्तसेवा, मान्यताप्राप्त दर्जा, प्रतवारी, पिकवण स्थिती याबाबतच्या निकषांची पूर्तता करण्यासाठी पीक काढणी व प्रतवारी दरम्यान सल्ला व मार्गदर्शन यांची मदत केली जाणार आहे.

Banana Cluster
Banana Market : खानदेशात केळी आवकेत मोठी घट

जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी राबवला जाणारा पहिलाचा प्रयोग असून केळी पिकाचा संपूर्ण आराखडा बनविला जाणार आहे. बाजार मागणीनुसार केळी क्लस्टर आणि गावपातळीवर केळी लागवड क्षेत्र निश्चित करून वर्षभर शेतीमाल पुरवठ्याचे नियोजन कंपनीमार्फत केले आहे.डेक्कन व्हॅली या कंपनीचे चेअरमन अजय बेल्हेकर याबाबत बोलताना म्हणाले, की फळपिकामध्ये राज्यभर त्या त्या विभागनिहाय क्लस्टर स्थापन करण्यात आले आहेत.

यामध्ये प्रामुख्याने डाळिंब, द्राक्षे, हळद अशा विविध पीकनिहाय क्लस्टर तयार केले गेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना अर्थपूर्ण फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. त्याचाच आधार घेत पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव भागांत नाशिकमधील सह्याद्री फार्मच्या माध्यमातून केळी पिकांसाठी क्लस्टर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या क्लस्टरचा फायदा अनेक शेतकऱ्यांना होणार असून इन्क्युबेशनसारख्या विविध सुविधा केळी उत्पादकांसाठी दिल्या जाणार आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगला दर्जात्मक माल मिळण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com